शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
4
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
5
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
6
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
7
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
8
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
9
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
10
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
11
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
12
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
13
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
14
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
15
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
16
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
17
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
18
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
19
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
20
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज

यू-डायस प्लस मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 10:29 AM

शैक्षणिक विषयक भौतिक व आर्थिक लक्ष ठरविण्यासाठी राज्यातील सर्व शाळांची माहिती यू-डायस प्लस या आॅनलाइन प्रणालीद्वारे संगणकीकृत करण्यात येणार आहे. जीआयएस मॅपिंगद्वारे शाळांची माहिती उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्दे९३ टक्के शाळांनी आॅनलाइन माहिती भरली उर्वरितांनी लवकर भरण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आवाहन

ओरोस : शैक्षणिक विषयक भौतिक व आर्थिक लक्ष ठरविण्यासाठी राज्यातील सर्व शाळांची माहिती यू-डायस प्लस या आॅनलाइन प्रणालीद्वारे संगणकीकृत करण्यात येणार आहे. जीआयएस मॅपिंगद्वारे शाळांची माहिती उपलब्ध होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १७३८ पैकी १६२० शाळांनी आॅनलाइन माहिती भरली असून ९३ टक्के काम पूर्ण झाले आहे.

ही माहिती भरण्यात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वलस्थानी आहे. ही माहिती भरण्यास शासनाने १० में पर्यंत मुदतवाढ दिली असून उर्वरित ७ टक्के शाळांनी या यू-डायस प्लस प्रणालीत माहिती भरून सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल स्थानी ठेवावा असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी केले आहे.इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळांची विविध विषयक माहिती यू डायस प्रणालीमध्ये आॅफलाइन पध्दतीने माहिती फिड केली जात होती. आता मात्र ही माहिती जमा करण्यासाठी केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालय व समग्र शिक्षा या योजनेच्या तांत्रिक सहायक ग्रुप कार्यालयाने राष्ट्रीय सूचना कार्यालयामार्फत यू-डायस प्लस प्रणाली कार्यान्वित केली आहे.

याचा उपयोग केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग, शिष्यवृत्ती, आदिवासी, सामाजिक न्याय विभाग, महिला व बालकल्याण, मध्यान्ह भोजन योजना या विभागासाठी उपयोगात येणार आहे. समग्र शिक्षा विभागाचे सन २०१९-२० या वर्षाचे वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी माहितीचा उपयोग होणार आहे.

मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, भौतिक सुविधा, शिक्षक प्रशिक्षण, डिजिटल स्कूल, आयसीटी लॅब, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, व्यवसाय शिक्षण, दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा याबाबतीत भौतिक व आर्थिक लक्ष ठरविण्यासाठी जमा झालेली माहिती वापरण्यात येणार आहे. याच माहितीवरुन विविध योजनांसाठी शासनाला अनुदान मंजूर करणे सहज शक्य होणार आहे.१0 मे पर्यंत मुदतवाढशाळास्तरावर संगणक प्रणालीवर माहिती नोंदविण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे. माहिती भरण्यासाठी शाळांना येत्या ३० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. आता ही माहिती भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही माहिती भरण्याचे ९३ टक्के काम पूर्ण झाले आहे. १७३८ शाळांपैकी १६२० शाळांनी ही माहिती आॅनलाइन भरली आहे. ही माहिती भरण्यात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल स्थानी आहे. यात जिल्हा राज्यात अव्वल ठेवण्यासाठी उर्वरित ७ टक्के शाळांनी या यू-डायस प्लस प्रणालीत माहिती भरावी असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी केले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रonlineऑनलाइनsindhudurgसिंधुदुर्ग