सावंतवाडीत हॉटेल मालकाला पेटविण्याचा कामगारांकडून प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 13:03 IST2019-05-13T13:02:13+5:302019-05-13T13:03:27+5:30

सावंतवाडी शहरातील हॉटेल व्यावसायिक जगदीश मांजरेकर यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून देण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने सावंतवाडी शहरात खळबळ माजली असून, अंगावर पेट्रोल ओतणारा युवक प्रथमेश लवू सावंत हा त्यांच्या हॉटेलमध्ये कामाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी मांजरेकर यांनी सावंतवाडी पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली आहे. पोलीस त्या कामगाराचा शोध घेत आहेत.

Types of workers to light a hotel owner in Sawantwadi | सावंतवाडीत हॉटेल मालकाला पेटविण्याचा कामगारांकडून प्रकार

सावंतवाडीत हॉटेल मालकाला पेटविण्याचा कामगारांकडून प्रकार

ठळक मुद्देहॉटेल मालकाला पेटविण्याचा प्रयत्नसावंतवाडीतील घटनेने उडाली खळबळ। कामगारांकडून प्रकार

सावंतवाडी : शहरातील हॉटेल व्यावसायिक जगदीश मांजरेकर यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून देण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने सावंतवाडी शहरात खळबळ माजली असून, अंगावर पेट्रोल ओतणारा युवक प्रथमेश लवू सावंत हा त्यांच्या हॉटेलमध्ये कामाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी मांजरेकर यांनी सावंतवाडी पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली आहे. पोलीस त्या कामगाराचा शोध घेत आहेत.

जगदीश मांजरेकर यांचे सावंतवाडीत हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये प्रथमेश हा काम करीत होता. हॉटेल मालक मांजरेकर व कामगार प्रथमेश सावंत यांच्यात पगाराच्या वादातून किरकोळ बाचाबाची झाली. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री प्रथमेश हा मांजरेकर हे खासकीलवाडा भागात राहत असलेल्या घरी गेला आणि त्याने मांजरेकर यांच्याशी बोलायचे आहे, असे म्हणत त्यांना बाहेर येण्यास सांगितले.

हॉटेल मालकावर पेट्रोल ओतण्याच्या प्रकारामुळे शहरात खळबळ माजली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर करीत आहेत.

घटनेनंतर कामगार पळाला; गुन्हा दाखल

हॉटेलमधील कामगाराने सोबत आणलेले पेट्रोल मालकाच्या अंगावर ओतून माचिसची काडी टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत मांजरेकर हे बाजूला गेल्याने त्यातून थोडक्यात बचावले. या घटनेनंतर सावंत हा पळून गेला. याबाबतची तक्रार मांजरेकर यांनी पोलिसांत दिली असून, पोलिसांनी हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Types of workers to light a hotel owner in Sawantwadi