चालत्या दुचाकीवर झाड कोसळून दोघे युवक जागीच ठार, सावंतवाडीतील घटना
By अनंत खं.जाधव | Updated: September 27, 2023 14:09 IST2023-09-27T14:03:36+5:302023-09-27T14:09:13+5:30
सावंतवाडी : सावंतवाडीत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली. शहरातील राजवाड्या नजीकचे झाड चालत्या दुचाकीवर कोसळून दोघे युवक ...

चालत्या दुचाकीवर झाड कोसळून दोघे युवक जागीच ठार, सावंतवाडीतील घटना
सावंतवाडी : सावंतवाडीत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली. शहरातील राजवाड्या नजीकचे झाड चालत्या दुचाकीवर कोसळून दोघे युवक जागीच ठार झाले. ही घटना काल, मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. युवकांना पडलेल्या झाडा खालून काढण्यात आले असून दोघांचेही मृतदेह येथील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.
राहुल प्रकाश पंदारे (वय २४) व संभाजी दत्ताराम पंदारे (२१, रा. गवळीवाडी, आजिवडे ता.कूडाळ) अशी मृतांची नावे आहेत. ते भजनासाठी सावंतवाडीत आले होते. तेथून घरी परताना ही घटना घडली.
सावंतवाडी शहरात दुपारपासून जोरदार पाऊस कोसळत होता. त्यातच रात्रीच्या सुमारास शहरातील राजवाड्याच्या संरक्षक कठड्याच्या बाजूलाच भले मोठे भेडल्या माडाचे झाड होते. ते झाड दुचाकीवर कोसळले अन् दोघे युवक ठार झाले. अचानक घडलेल्या प्रकारानंतर स्थानिक नागरिकांकडून धावाधाव करण्यात आली अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. दरम्यान पोलिसांनी नगरपरिषदच्या कर्मचाऱ्यांच्या तसेच नागरिकांच्या मदतीने झाड बाजूला करून मृतदेह बाहेर काढले व रूग्णालयात दाखल केले.