शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर लोखंडी पत्रे कोसळून दुचाकीस्वार जखमी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 16:16 IST

Kankavli Highway Accident- मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामध्ये दिलीप बिल्डकाँन या ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एकदा कणकवलीत अपघात घडला आहे. अप्पासाहेब पटवर्धन चौकापासून जवळच महामार्गावर लोखंडी पत्रे कोसळून एक दुचाकीस्वार जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देठेकेदाराच्या कामगारांनी काढला पळ स्थानिकांची गुन्हा दाखल करण्याची मागणी

कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामध्ये दिलीप बिल्डकाँन या ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एकदा कणकवलीत अपघात घडला आहे. अप्पासाहेब पटवर्धन चौकापासून जवळच महामार्गावर लोखंडी पत्रे कोसळून एक दुचाकीस्वार जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.दरम्यान, या घटनेनंतर संतप्त स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही वेळ रोखून धरली. तसेच संबधित ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली.कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरणा अंतर्गत उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या उड्डाण पुलाखालील सर्व्हिस रोडवर महामार्ग ठेकेदाराने पत्रे लावले आहेत. सोमवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास हॉटेल एम एच ०७ समोर महामार्गावर तब्बल सहा फूट उंचीचे ३ पत्रे कोसळले. त्याचवेळी कणकवली ते जानवली असा दुचाकी वरून प्रवास करीत असणाऱ्या नंदादीप सावंत (रा . जानवली ) यांच्या अंगावर त्यातील एक पत्रा पडला. त्यामुळे ते दुचाकीसह पत्र्याखाली अडकले.या घटनेनंतर स्थानिक नागरीकांनी घटनास्थळी धाव घेत सावंत यांना पत्र्याखालून बाहेर काढले. दुचाकीचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. किरकोळ जखमी झालेल्या नंदादीप सावंत यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. आता त्यांची प्रकृती ठीक आहे.दरम्यान, मुंबई - गोवा महामार्गावर यापूर्वी देखील चालत्या दुचाकीवर पत्रा कोसळून एक युवक जखमी झाला होता. तसेच उड्डाणपुलाच्या स्लॅबचा काही भाग देखील कोसळला होता. त्यानंतर देखील महामार्ग चौपदरीकरण ठेकेदाराने सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले असून ही बाब पादचाऱ्यांच्या कधी तरी जीवावर बेतण्याची शक्यता आहे. या प्रकारानंतर ठेकेदाराच्या कामगारांनी काम सोडून तेथून पळ काढला.कणकवली पोलिस निरीक्षक संजय धुमाळ व नगराध्यक्ष समीर नलावडे , नगरसेवक कन्हैया पारकर यांनी मध्यस्ती करीत संतप्त नागरिकांची समजूत काढली. तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. मात्र, महामार्गावर या घटनेनंतर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्गPoliceपोलिसsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली