मुंबई-गोवा महामार्गावरील ओटव येथे तिहेरी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 01:08 PM2018-12-28T13:08:49+5:302018-12-28T13:09:01+5:30

मुंबई-गोवा महामार्गावरील ओटव फाटा येथे आज आराम बस, आयशर टेम्पो आणि मोटरसायकलस्वार या तिघांत अपघात झाला.

Two-wheeler death in a triple crash on Otav on Mumbai-Goa highway | मुंबई-गोवा महामार्गावरील ओटव येथे तिहेरी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावरील ओटव येथे तिहेरी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

Next

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील ओटव फाटा येथे आज आराम बस, आयशर टेम्पो आणि मोटरसायकलस्वार या तिघांत अपघात झाला. यात दुचाकीस्वार दीपक राणे (रा.कोळोशी) हा तरुण जागीच ठार झाला. सकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर आरामबस चालकाने पलायन करून कणकवली पोलीस ठाणे गाठले.

 मुंबई ते गोवा अशी वेगाने जाणारी आरास बस ओटव फाटा येथे आयशर टेम्पोला समोरून ढकली. या आयशर टेम्पोमागे दुचाकी घेऊन दीपक राणे येत होता. वेगात असलेल्या आराम बस चालकाने आयशर टेम्पोला सुमारे पंचवीस फूट मागे फरपटत नेले. यात दुचाकीस्वार देखील टेम्पोखाली चिरडला गेला. अपघातामध्ये दुचाकीस्वार ठार झाल्याचे लक्षात येताच आराम बस चालकाने तेथून पलायन करून कणकवली पोलीस ठाणे गाठले.

अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. यावेळी बेदरकारपणे आराम बस चालाविणार्‍या चालकाविरोधात तीव्र संताप व्यक्त झाला. यावेळी पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी आणि स्थानिक नागरिक यांच्यात वादंगही झाला होता. मयत दीपक राणे हा तेथीलच एका बागेला पाणी लावण्याचे काम करतो. झाडांना पाणी घालून मागे परतत असताना तो आयशर टेम्पोखाली चिरडला गेला.

Web Title: Two-wheeler death in a triple crash on Otav on Mumbai-Goa highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.