दुचाकी अपघातात युवक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 18:21 IST2019-09-18T18:20:33+5:302019-09-18T18:21:20+5:30
डंपर व दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात नेरूर गोंदियाळे येथील एकनाथ मार्गी (३४) हा युवक गंभीर जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात नेरूर गोंदियाळे येथील गणेश घाटाजवळील मार्गावर मंगळवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास झाला.

दुचाकी अपघातात युवक गंभीर जखमी
कुडाळ : डंपर व दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात नेरूर गोंदियाळे येथील एकनाथ मार्गी (३४) हा युवक गंभीर जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात नेरूर गोंदियाळे येथील गणेश घाटाजवळील मार्गावर मंगळवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास झाला.
मार्गी हे मंगळवारी सायंकाळी पिंगुळी तिठा येथे येत असताना या मार्गावरील गणेश घाटाजवळ आले असता समोरून येणाऱ्या डंपरची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या धडकेत मार्गी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तेथील ग्रामस्थांनी त्यांना जखमी अवस्थेत कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले.