शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

दोन जागा काँग्रेसकडे, एक शिवसेनेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2015 00:03 IST

भिरवंडे, गांधीनगर, तोंडवली बावशी निवडणूक : प्राजक्ता कदम, मनिषा सावंत, सुप्रिया रांबाडे सरपंचपदी

कनेडी/नांदगांव : भिरवंडे आणि गांधीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीत सरपंचपदी दोन्हीही महिला विराजमान झाल्या आहेत. भिरवंडे सरपंचपदी प्राजक्ता भगवान कदम तर गांधीनगर सरपंचपदी मनिषा दीपक सावंत यांची वर्णी लागली आहे. या निवडणुका सोमवारी घेण्यात आल्या. दोन्ही ग्रामपंचायती काँग्रेसप्रणित आहेत. तर तोंडवली-बावशी ग्रुप ग्रामपंचायतीवर एप्रिल महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने वर्चस्व मिळविल्यानंतर सोमवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत सुप्रिया रांबाडे व उपसरपंच कौस्तुभ नाडकर्णी यांची बिनविरोध निवड केली.भिरवंडे, गांधीनगर ग्रामपंचायत निवडणुकीत भिरवंडे बिनविरोध तर गांधीनगर गुप्त मतदान पद्धतीने सरपंच निवडणूक झाली. भिरवंडे सरपंचपदी प्राजक्ता कदम तर उपसरपंचपदी मिलिंद सावंत यांची वर्णी लागली. गांधीनगर सरपंचपदी मनिषा सावंत तर उपसरपंचपदी अस्मिता सावंत यांची वर्णी लागली. दोन्ही सरपंच, उपसरपंच यांचे स्वागत सतीश सावंत यांनी केले.तोंडवली-बावशी ग्रुप ग्रामपंचायतीच्या एप्रिल महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने सहा जागांवर विजय मिळविला होता. यावेळी राष्ट्रवादीचे अनंत बोभाटे अवघ्या एका मताने निवडून आले होते. याचवेळी या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार असा शिक्कामोर्तब झाला होता. याच झालेल्या निवडणुकीनंतर सोमवारी झालेल्या नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी राखीव असणाऱ्या सरपंच पदासाठी सुप्रिया रांबाडे व उपसरपंच कौस्तुभ नाडकर्णी या दोन शिवसेना पुरस्कृत उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यानंतर झालेल्या निवडीत सुप्रिया रांबाडे यांची सरपंच म्हणून व कौस्तुभ नाडकर्णी यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. यावेळी विद्यमान नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांना शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य दीपक कांडर, सोनाली शिंदे, निता ईस्वलकर, अंकिता कुडतरकर, माजी सरपंच उमेश कुडतरकर, अतुल सदडेकर, सुरेश रांबाडे, सुभाष नार्वेकर, चंद्रकांत बोभाटे, बाळा नाडकर्णी, तात्या निकम, देवेंद्र बोभाटे, जीजी खडपे, आनंद गुरव, प्रकाश मेस्त्री यांनी स्वागत केले.निवडणूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी ममता तांबे, ग्रामसेवक प्रशांत वर्दम यांनी काम पाहिले. (वार्ताहर)