शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारु वाहतूक प्रकरणी कोल्हापूरचे दोघे ताब्यात, दारूसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 12:39 IST

बांदा : राज्य उत्पादन शुल्काच्या इन्सुली पथकाने आलिशान महागड्या मोटारीतून दारू वाहतूक केल्याप्रकरणी कोल्हापूर येथील दोघांना राज्य ताब्यात घेतले ...

बांदा : राज्य उत्पादन शुल्काच्या इन्सुली पथकाने आलिशान महागड्या मोटारीतून दारू वाहतूक केल्याप्रकरणी कोल्हापूर येथील दोघांना राज्य ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुरुवारी सकाळी आठ वाजता जुन्या बांदा-पत्रादेवी मार्गावर पंजाबी ढाब्याच्या परिसरात करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख ३९ हजार २५० रुपये किमतीच्या दारूसह एकूण ६ लाख ३९ हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कोल्हापूर येथील दोघांना ताब्यात घेतले.याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोव्याहून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारूची आलिशान मोटारीतून बेकायदा वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या इन्सुली तपासणी नाका पथकाला मिळाली होती. त्यानुसार जुन्या बांदा - पत्रादेवी मार्गावर पंजाबी फॅमिली ढाब्याजवळ सापळा रचण्यात आला होता. गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास गोव्याहून येणारी आलिशान मोटार (एमएच ०२ सीएच ३१३१) तपासणीसाठी थांबविण्यात आली.गाडीची तपासणी केली असता गाडीच्या पाठीमागील सीटवर तसेच डिकीत गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा अवैध साठा आढळून आला. पथकाने १ लाख ३९ हजार २५० रुपये किमतीची दारू, ५ लाख रुपये किमतीची मोटार असा एकूण ६ लाख ३९ हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही संशयितावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी चालक ऋषिकेश प्रफुल्ल जाधव (२७) व शीतल गणपती शेटे (४५, दोघे रा. कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.ही कारवाई इन्सुली तपासणी नाका पथकाचे निरीक्षक भानुदास खडके, दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर, विवेक कदम, जवान रणजित शिंदे, दीपक वायदंडे, सतीश चौगुले, सागर सूर्यवंशी, अभिषेक खत्री यांच्या पथकाने केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर करत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस