शिरोडा वेळागर समुद्रात सावंतवाडीतील दोन कामगार बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 16:30 IST2022-10-05T16:30:17+5:302022-10-05T16:30:57+5:30

दसऱ्याची सुट्टी असल्याने अनेक जण समुद्र किनारी फिरायला जातात त्या प्रमाणे ते दोघेही फिरायला गेले होते.

Two laborers from Sawantwadi drowned in Shiroda velagar sea | शिरोडा वेळागर समुद्रात सावंतवाडीतील दोन कामगार बुडाले

शिरोडा वेळागर समुद्रात सावंतवाडीतील दोन कामगार बुडाले

सिंधुदुर्ग  - मौजमजा करण्यासाठी गेलेले सावंतवाडीतील दोन कामगार बुडाल्याची घटना घडली असून त्यातील एकाचा मृतदेह सापडला आहे, तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. ही घटना साडेतीन वाजण्याच्या सुमारास शिरोडा वेळागर परिसरात घडली. दोघे कामगार मुळचे राजस्थान येथील आहेत मात्र बरीच वर्षे सावंतवाडीत काम करत होते. या घटनेला वेंगुर्ल्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दुजोरा दिला आहे. उशिरापर्यंत नावे मात्र कळू शकली नव्हती. 

दसऱ्याची सुट्टी असल्याने अनेक जण समुद्र किनारी फिरायला जातात त्या प्रमाणे ते दोघेही फिरायला गेले होते. मात्र दुर्देवाने दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून घटनास्थळी  ठिकाणी मदतकार्य सुरू आहे. स्थानिक स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून समुद्रात बेपत्ता झालेल्याचा शोध सुरू आहे. वाचविण्यात आलेल्या दुसऱ्या युवकाला बाहेर काढण्यास यश आले होते परंतु त्याचा मृत्यू झाला असे स्थानिकांचे म्हणणे आहे. हे दोघेही सावंतवाडीतील असून एका  फरशीच्या दुकानात कामाला होते. ते मूळचे राजस्थान येथील आहेत.
 

Web Title: Two laborers from Sawantwadi drowned in Shiroda velagar sea