कार अपघातात कोल्हापूरचे दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 17:02 IST2019-07-15T17:01:43+5:302019-07-15T17:02:38+5:30
मालवण-चौके मार्गावर कर्लाचाव्हाळ येथे कोल्हापूर येथील कारला अपघात झाला. या अपघातात कोल्हापूरचे दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. हा अपघात शनिवारी पहाटे झाल्याचे सांगण्यात आले. मालवण पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली होती.

मालवण-चौके मार्गावर कर्लाचाव्हाळ येथे कोल्हापूर येथील कारला अपघात झाला.
मालवण : मालवण-चौके मार्गावर कर्लाचाव्हाळ येथे कोल्हापूर येथील कारला अपघात झाला. या अपघातातकोल्हापूरचे दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. हा अपघात शनिवारी पहाटे झाल्याचे सांगण्यात आले. मालवण पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली होती.
कोल्हापूर येथील मित्रांचा ग्रुप मालवण येथे पर्यटनासाठी कारने आला होता. मालवणहून कोल्हापूरला परतत असताना कर्लाचाव्हाळ येथील वळणावर भरधाव कार रस्त्याच्या कडेला आदळून पलटी झाली. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याचे बोलले जात होते. या अपघातात दोघांना गंभीर दुखापत झाली असून एकाच्या डोक्याला तर दुसऱ्याच्या पायाला जबर मार लागला. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. याबाबत पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली होती. जखमींची नावे समजू शकलेली नाहीत.