शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातील सोनुर्ली रेल्वे ट्रॅक परिसरात दोन मृतदेह आढळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 14:27 IST

कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने माजली खळबळ

सावंतवाडी : सोनुर्ली येथील सिद्धेश सगुण गावकर (२८) या युवकाचा शनिवारी रात्रीच्या सुमारास रेल्वेची धडक बसून जागीच मृत्यू झाल्याची. ही घटना ताजी असतानाच ओडिसा येथील नाजू मलिक (२८) या युवकाचा सोनुर्ली येथील रेल्वे ट्रक परिसरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. दोन दिवसात दोन मृतदेह आढळून आले आहेत.रेल्वेची धडक बसल्यामुळे सोनुर्ली येथील सिद्धेश सगुण गावकर या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना  शनिवारी रात्री घडली याबाबतची माहिती रेल्वेस्थानकाचे ट्रॅकमन विनोद चव्हाण यांनी दिली आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. सिद्धेश हा आपले काम आटवून घरी जात होता. यावेळी त्याला रेल्वेची धडक बसली असावी असा अंदाज पोलीसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.नाजू मलिक याचा मृतदेह रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आढळून आला आहे. मलिक हा युवक व्यक्ती ही वेडसर होती. त्याला नातेवाईक रेल्वे मधून ओडिसा येथे नेत होते. मात्र वाटेतच चालत्या रेल्वेतून त्याने उडी घेतली होती. त्यानंतर हा प्रकार कुडाळच्या आसपास घडल्याचा अंदाज व्यक्त करत नातेवाईकांनी त्याठिकाणी बेपत्ताची खबर दिली होती. तर त्याचा मृतदेह आढळून आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित मृत युवक हा वेडसर असल्याचे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे होते. त्याला ओडिसा येथे नेत असताना त्याने चालत्या रेल्वेतून उडी टाकली होती. हा प्रकार कुडाळ परिसरात घडल्याचा अंदाज दाखवत नातेवाईकांनी त्या ठिकाणच्या पोलिसात याबाबतची खबर दिली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर  युवकाचा शोध घेतला.मात्र तो आढळून न आल्याने बेपत्ताची नोंद कुडाळ पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. तर आज त्याचा मृतदेह सोनुर्ली परिसरात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.सोनुर्ली परिसरात दोन दिवसात दोन मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस