करुळ घाटात ट्रक बंद, चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासात अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 12:27 PM2021-09-16T12:27:06+5:302021-09-16T12:30:00+5:30

एकेरी वाहतूक सुरू : वैभववाडी तहसीलदार, पोलीस निरीक्षक घटनास्थळी

Truck stops in Karul Ghat, hinders return journey of servants | करुळ घाटात ट्रक बंद, चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासात अडथळा

करुळ घाटात ट्रक बंद, चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासात अडथळा

Next
ठळक मुद्देवैभववाडीहून कोल्हापूरकडे जाणारा ट्रक करूळ घाटात अचानक बंद पडला. कोकणात चतुर्थीनिमित्त दाखल झालेले चाकरमानी गणपती विसर्जनानंतर परतीच्या प्रवासाला लागले आहेत.

वैभववाडी : करूळ घाटात अचानक ट्रक बंद पडल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. रस्त्याच्या मध्यभागी ट्रक बंद पडल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तहसीलदार व पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

वैभववाडीहून कोल्हापूरकडे जाणारा ट्रक करूळ घाटात अचानक बंद पडला. कोकणात चतुर्थीनिमित्त दाखल झालेले चाकरमानी गणपती विसर्जनानंतर परतीच्या प्रवासाला लागले आहेत. करुळ घाटमार्गे मोठ्या संख्येने चाकरमानी मुंबईकडे निघाले आहेत. आज घाटात ट्रक बंद पडल्याने मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला. दरम्यान, तहसीलदार रामदास झळके व पोलीस निरिक्षक अतुल जाधव यांनी तात्काळ घाटात धाव घेतली. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. बंद ट्रक बाजूला करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
 

Web Title: Truck stops in Karul Ghat, hinders return journey of servants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app