sindhudurg: ट्रकची शिवशाहीला धडक, आठ प्रवासी जखमी; कोलगाव येथील घटना

By अनंत खं.जाधव | Updated: June 15, 2023 16:02 IST2023-06-15T16:00:58+5:302023-06-15T16:02:00+5:30

जखमींची प्रकृती स्थिर

Truck hits Shivshahi, eight passengers injured Incident at Kolgaon sindhudurg | sindhudurg: ट्रकची शिवशाहीला धडक, आठ प्रवासी जखमी; कोलगाव येथील घटना

sindhudurg: ट्रकची शिवशाहीला धडक, आठ प्रवासी जखमी; कोलगाव येथील घटना

सावंतवाडी : जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरून सिमेंट वाहतूक करणार्‍या ट्रकने शिवशाही बसला समोरुन धडक दिली. या अपघातात दोन्ही गाड्यातील चालकासह बसमधील ८ प्रवासी जखमी झाले. तर, दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. कोलगाव येथे आज, गुरूवारी सकाळच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

सरिता महेंद्र माणगावकर (वय-६० तळवडे), गणेश महेंद्र सुतार (५५ पुणे), डॉ. निरंजन शर्मा (२४, सावंतवाडी), शितल शांता कमलेकर (६२, तळवडे), विजयमाला विष्णुदास धुरी (७८, सोनवडेपार), जाकीयाबी अब्बास शेख (४७, मालवण) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

ट्रक चालक सावंतवाडीकडे निघाला होता. तर, बस कुडाळच्या दिशेने जात होती. दरम्यान कोलगाव येथे ट्रकची शिवशाही बसला समोरासमोर धडक झाली.  अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली. 
 

Web Title: Truck hits Shivshahi, eight passengers injured Incident at Kolgaon sindhudurg