शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

तंबाखूजन्य वस्तूंची वाहतूक; आरामबस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 11:40 AM

Tobacco Ban Sindhudurg- वैधानिक इशारा नसलेल्या तंबाखुजन्य वस्तूंची वाहतूक करणाऱ्या आराम बसवर वैभववाडी पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी बसच्या चालकांसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान २४ हजाराच्या मुद्देमालांसह आराम बस जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई करुळ तपासणी नाक्यावर करण्यात आली.

ठळक मुद्देतंबाखूजन्य वस्तूंची वाहतूक; आरामबस जप्त दोघांवर गुन्हे दाखल : करुळ तपासणी नाक्यावर कारवाई

वैभववाडी : वैधानिक इशारा नसलेल्या तंबाखुजन्य वस्तूंची वाहतूक करणाऱ्या आराम बसवर वैभववाडी पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी बसच्या चालकांसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान २४ हजाराच्या मुद्देमालांसह आराम बस जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई करुळ तपासणी नाक्यावर करण्यात आली.मुंबईहून गोव्याकडे जाणारी आराम बसक्रमांक (एमएम ०७, पी-८२००) करूळ तपासणी नाक्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेंबल मारूती सोनटक्के, संदीप राठोड या कर्मचाऱ्यांनी तपासणी करीता थांबविली. गाडीची तपासणी करताना पोलिसांना सामान कक्षात अनेक पार्सल दिसून आली. यातील काहीची पाहणी केली असता एकाबॅगेत हुक्का ओढण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी, कोळसा दिसून आला.याशिवाय दुसऱ्या एका बॅगेत वैधानिक इशारा नसलेली सिगारेटची पाकिटे निदर्शनास आली. त्यामुळे ही माहिती पोलिसांनी वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अधिक चौकशी करून आरामबस वैभववाडी पोलीस स्थानकात आणली. त्या बसमधील सर्व साहित्याची पुन्हा तपासणी केली. तपासणीअंती त्यांनी बसमध्ये वैधानिक इशारा नसलेल्या २४ हजार रूपये किमंतीच्या सिगारेट आढळून आल्या.या प्रकरणी पोलिसांनी गाडीचे चालक इंदरसिंग हिरालालजी गुजर, (४५) व क्लिनर भैरू शंभु नाथ, (४३, दोन्ही रा. मध्यप्रदेश) यांच्यावर तंबाखुजन्य प्रतिबंधात्मक कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी १० लाख रूपये किमंतीची आरामबस देखील जप्त केली आहे. या दोन्ही संशयितांना सोमवारी कणकवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.प्रवाशांना दुसऱ्या गाडीतून पाठविलेपोलिसांनी आराम बसवर कारवाई केल्यामुळे या गाडीतील प्रवाशांना दुसऱ्या गाडीतून गोव्याच्या दिशेने पाठविण्यात आले. आराम बसमध्ये सुरूवातीला हुक्का ओढण्यासाठी लागणारी भांडी, कोळसा पोलीसांच्या हाती लागल्यामुळे खळबळ माजली होती. परंतु त्यानंतर पोलिसांनी वैधानिक इशारा नसलेल्या सिगारेटचा आधार घेत गुन्हा दाखल केला. हुक्का ओढण्यासाठी लागणारी भांडी वाहतूक करण्यास परवानगीची गरज नाही का असे विचारले असता पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी परवानगी नसल्याचे स्पष्ट केले. 

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदीsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस