शहरं
Join us  
Trending Stories
1
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
2
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
5
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
6
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
7
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
8
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
9
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
10
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
11
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
12
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
13
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
14
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
15
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
16
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
17
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
18
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
19
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरहून येणाऱ्या गाड्या अडविणार

By admin | Updated: January 9, 2015 00:16 IST

नीतेश राणे यांचा इशारा : निर्णय न बदलल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश बंदी

कणकवली : कोल्हापूर येथून कोकणात येणाऱ्या एस.टी.च्या गाड्या रंकाळा स्थानकाऐवजी संभाजीनगर स्थानकावरून सोडण्याच्या निर्णयाबद्धल १५ जानेवारीपर्यंत तोडगा न निघाल्यास कोल्हापूर येथून सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या गाड्या दाजीपूर येथे अडविण्याचा इशारा आमदार नीतेश राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत आज, गुरुवारी दिला आहे. याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास कोल्हापुरातील गाड्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही, असाही इशारा राणे यांनी यावेळी दिला.यावेळी आमदार राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूर येथे जाणाऱ्या एस.टी.च्या गाड्या १ जानेवारीपासून संभाजीनगर स्थानकापर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सिंधुदुर्गमधील प्रवाशांचे हाल होत आहेत. तसेच एस.टी.च्या भारमानातही घट झाली आहे. याप्रश्नी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल, असेही राणे यांनी स्पष्ट केले. ३२ फेऱ्यांसाठी आटापिटासिंधुदुर्ग एस.टी. विभागातून दररोज एस.टी.च्या ३२ फेऱ्या कोल्हापूर येथे होत असतात. मात्र, या गाड्यांमुळे कोल्हापुरात वाहतुकीची कोंडी होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. कोल्हापूर जिल्ह्याबाहेरून कोल्हापूर शहरात असंख्य वाहने दररोज दाखल होत असतात. त्या तुलनेत सिंधुदुर्गमधून एस.टी.च्या कोल्हापुरात जाणाऱ्या गाड्यांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाविरोधात त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोल्हापूर येथे जाणाऱ्या एस.टी.च्या गाड्या संभाजीनगर स्थानकापर्यंत नेण्याच्या निर्णयामुळे सिंधुदुर्ग एस.टी. विभागाच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. याबाबतचा अहवाल मुंबई येथील एस.टी. प्रादेशिक कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. तसेच या निर्णयाला विरोध दर्शविण्यात आला आहे. मात्र, याबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावरूनच घेण्यात येईल, अशी माहिती एस.टी.चे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांनी दिली.१५ ते ८० रुपये भुर्दंड पणजी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, राधानगरी, देवगड, गगनबावडा डेपोंच्या गाड्या, विजयदुर्ग या प्रमुख गाड्यांतील प्रवाशांना शहरात येण्यासाठी संभाजीनगर येथे उतरावे लागणार आहे. येथे शहरात येण्यासाठी रिक्षा किंवा के.एम.टी.बसचा आधार घ्यावा लागणार आहे. यामुळे कमीतकमी १५ ते ८० रुपयांपर्यंत आता जादा पैसे मोजावे लागत आहे. तसेच गगनबावडामार्गे मध्यवर्ती बसस्थानकावरून पुढे मार्गस्थ होणाऱ्या गाड्यांचे किलोमीटर वाढल्याने त्यांच्या तिकिटाच्या दरामध्ये नऊ रुपयांची वाढ झाली आहे. कोंडी कमी करण्यासाठीकोल्हापूर शहरातून कोकणात जाणाऱ्या व येणाऱ्या एस.टी. गाड्यांमुळे वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी यामध्ये बदल करण्यात आला आहे. कोकणातून येणाऱ्या काही एस.टी. बसेस मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत न येता संभाजीनगर बसस्थानकापर्यंत येतील व तेथूनच पुन्हा कोकणात जाणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी १ जानेवारी २०१५ पासून लागू झाली आहे.