तपासणी करण्याचा वेग वाढविला --बांदा येथील वाहनांची गर्दी नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 03:36 PM2020-05-06T15:36:20+5:302020-05-06T15:38:28+5:30

बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी माल वाहतूक करणाºया ट्रकची वाहतूक दोडामार्गमार्गे वळविल्याने मंगळवारी ट्रकच्या रांगा नियंत्रणात आल्याचे चित्र दिसून आले. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

Traffic congestion at Banda under control | तपासणी करण्याचा वेग वाढविला --बांदा येथील वाहनांची गर्दी नियंत्रणात

तपासणी करण्याचा वेग वाढविला --बांदा येथील वाहनांची गर्दी नियंत्रणात

Next
ठळक मुद्दे‘लोकमत’च्या वृत्ताची गोवा सरकारने घेतली दखल 

बांदा : बांदा शहरात गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याचे चालक व क्लीनर मुक्त संचार करीत होते. परंतु हे चालक व क्लीनर  मुंबई, पुणे, व इतर राज्यातील  कोरोनाबाधित  रेड झोन येथील असल्याने बांदा शहरातील लोक गेले दोन आठवडे भीतीच्या छायेत होते.   याविषयी  ‘बंदोबस्त वाढल्याने बांदावासीय त्रस्त’ या  मथळ्याखाली  बातमी  लोकमतमध्ये मंगळवारी प्रसिद्ध झाली. याची दखल घेत   गोवा सरकारने वाहनांची तपासणी करण्याचा वेग वाढविला आहे. 

बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी माल वाहतूक करणाºया ट्रकची वाहतूक दोडामार्गमार्गे वळविल्याने मंगळवारी ट्रकच्या रांगा नियंत्रणात आल्याचे चित्र दिसून आले. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. वाहनांच्या कागदपत्रांसह चालक व क्लीनरची आरोग्यविषयक तपासणी केल्यानंतरच गोव्यात प्रवेश  दिला जातो.  

एका वाहनासाठी सुमारे अर्धा तासाहून अधिक वेळ  लागत  होता.   यामुळे सोमवारी गोवा  सीमेवर वाहनांच्या २ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.  ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी    मंगळवारी गोवा सरकारने प्रती वाहन तपासणीसाठी १० मिनिटे लागली असल्याची माहिती बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी दिली. 

यावेळी चालकांना गाडीतून बाहेर पडू नये. याविषयी बांदा पोलीस सूचना देत होते. यामुळे बांदा परिसरात  मालवाहक  ट्रकची संख्या नियंत्रणात आल्याने स्थानिकांतून समाधान व्यक्त होत आहे. हा प्रकार  गेले दोन आठवडे सुरू होता. 

गोवा सरकार आपल्या नियमाप्रमाने तपासणी सुरू असल्याचे सांगत आहे. पण याचा नाहक त्रास बांदावासीयांना तसेच  स्थानिक प्रशासन यांना होत आहे.   यावर  गोवा सरकार, महाराष्ट्र  सरकार, सिंधुदुर्गातील प्रशासन  यांच्याकडून परिस्थिती पुढील दिवसांत नियंत्रणात राहील का?  अशी  शंका  स्थानिक नागरिकांनी उपस्थित केली आहे.   

सिंधुफोटो ०४

गोवा सरकारने वाहनांची तपासणी करण्याचा वेग वाढविला आहे.

Web Title: Traffic congestion at Banda under control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.