आंबोलीतील वर्षा पर्यटनात पर्यटक चिंब; हजारो पर्यटक दाखल, घाटात मोठी वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 19:12 IST2025-06-29T19:12:44+5:302025-06-29T19:12:57+5:30

आंबोलीमधील सर्वच ठिकाणी पर्यटकांची गर्दी

Tourists flock to rain tourism in Amboli; Thousands of tourists arrive | आंबोलीतील वर्षा पर्यटनात पर्यटक चिंब; हजारो पर्यटक दाखल, घाटात मोठी वाहतूक कोंडी

आंबोलीतील वर्षा पर्यटनात पर्यटक चिंब; हजारो पर्यटक दाखल, घाटात मोठी वाहतूक कोंडी

आंबोली: सध्या आंबोली चे वर्षा पर्यटन झोकात सुरू असून सध्या आंबोली च्या धबधब्यावर पर्यटक चिंब झाले आहेत पावसाने थोडीशी उघडीप घेतली असली तरी  हजारो पर्यटक सध्या धबधब्याचा आनंद लुटताना दिसत आहेत.

पर्यटक मिळेल त्या वाहनाने मुख्य धबधब्यावर येत असल्याने घाटात वाहतूक कोंडी झाली असून ही कोंडी सोडवताना पोलिसांची चांगलीच दमछाक होतना दिसत आहे.त्यातच मद्यपी पर्यटकांनी मुख्य रस्त्यावर नाचगाणी सुरू केल्याने वाहतुकीला अडथळा होतना दिसत आहे.रविवारी कोल्हापूर बेळगाव गोवा परिसरातील दहा ते पंधरा हजार पर्यटक  वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आंबोली मध्ये दाखल झाले होते.

वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आज आंबोलीमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्या पार्क केल्यामुळे आंबोलीतील मुख्य मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे पर्यटक हैराण झाले आहेत. तर कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक झाली.विशेषतः मुख्य धबधबा आणि इतर पर्यटन स्थळांच्या परिसरात वाहनांची मोठी गर्दी दिसून येत आहे. पर्यटकांनी रस्त्याच्या दुतर्फा मिळेल त्या जागेत गाड्या पार्क केल्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणेही कठीण झाले आहे. परिणामी पर्यटकांना आपल्या गाड्या अनेक किलोमीटर दूर पार्क करून पायी चालावे लागत आहे. 

स्थानिक प्रशासनाने आणि वाहतूक पोलिसांनी या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पर्यटक आणि स्थानिकां कडून केली जात आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्याची आणि पार्किंगसाठी योग्य व्यवस्था करण्याची गरज आहे, असे मत पर्यटकातून व्यक्त करण्यात आला.

आंबोलीमधील सर्वच ठिकाणी पर्यटकांची गर्दी
आंबोली तील मुख्य धबधब्यावर पर्यटकांची गर्दी झाली होती पण महादेव गड पाॅईट ही पर्यटकांनी फुल्लून गेला होता.कावळेसाद पॉईंट वर ही पर्यटकांची गर्दी होती त्या शिवाय अनेक पर्यटक आंबोली चौकुळ रस्त्यावर ही दिसून येत होते.

Web Title: Tourists flock to rain tourism in Amboli; Thousands of tourists arrive