शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

वाफोलीत कार कोसळून अपघात, छत्तीसगडमधील पर्यटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 2:52 PM

वाफोली धरणानजीक बांदा-दाणोली रस्त्यावर एका वळणावर कार सुमारे आठ फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. छत्तीसगड राज्यातील पर्यटक गोव्यात जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व कार दरीत कोसळली.

ठळक मुद्देवाफोलीत कार कोसळून अपघात, छत्तीसगडमधील पर्यटकगोव्यात जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले

बांदा : वाफोली धरणानजीक बांदा-दाणोली रस्त्यावर एका वळणावर कार सुमारे आठ फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. छत्तीसगड राज्यातील पर्यटक गोव्यात जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व कार दरीत कोसळली.मात्र, कारमधील एअरबॅग्ज ऐनवेळी उघडल्याने कोणालाही गंभीर इजा झाली नाही. कारमधील पाचही प्रवासी सुखरुप आहेत. कारचे दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाफोलीचे सामाजिक कार्यकर्ते विनेश गवस व मित्रमंडळाने पर्यटकांना सहकार्य केले. हा अपघात मंगळवारी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास झाला.

या मार्गातून रहदारीही मोठ्या प्रमाणात असल्याने लहान-मोठ्या अपघातांची मालिकाच सुरू आहे. यापूर्वी रात्रीच्या सुमारात दहाच्यावर अपघात झाले आहेत. एक महिन्यापूर्वी याच वळणावर जेसीबी दुसऱ्या वाहनाला बाजू देत असताना उलटून अपघातग्रस्त झाला होता. ंयामध्ये काही प्रवासी जखमी झाले होत.

दिवस-रात्र पर्यटक याच मार्गावरून आंबोली, गोव्यात जात-येत असतात. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते. तसेच एसटी आणि अवजड वाहनांची वाहतूकही या मार्गावरून होत असते. याबाबत संबंधित विभागाने या वळणावर लवकरात लवकर उपाययोजना करणे आवश्यक आहे.

तसेच या वळणावर सुरक्षिततेचे उपाय म्हणून रस्त्यावरून वाहनांना सतर्कतेसाठी बाजूला फलक लावणे गरजेचे आहे. दोन्ही बाजूंनी झुडपे वाढली आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी येणाºया वाहनचालकांना समोरून येणारी वाहने दृष्टीस पडत नाहीत. त्यामुळे या वळणावर सातत्याने अपघात होत असतात.

सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार कळवूनही झुडपे तोडण्याची कार्यवाही केलेली नाही. यासाठी लवकरच लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशारा विनेश गवस यांनी दिला आहे. 

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग