शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळ एमआयडीसीमधील विश्रामगृह पर्यटकांचे आकर्षण ठरणार

By admin | Updated: August 18, 2014 23:28 IST

जनतेने अज्ञानी खासदार निवडला

कुडाळ : वैभवशाली व निसर्गसंपन्न या कुडाळच्या सौंदर्यात एमआयडीसीच्या अत्याधुनिक सेवा सुविधांनी परिपूर्ण असलेले विश्रामगृह निश्चितच भर टाकेल व पर्यटनाच्या या जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांच्या निवासासाठी ही वास्तू निश्चितच आवडेल, असे प्रतिपादन पालकमंत्री नारायण राणे यांनी कुडाळ एमआयडीसीच्या विश्रामगृहाच्या उद्घाटनप्रसंगी केले.कुडाळ एमआयडीसी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने सुमारे पाच कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या एमआयडीसीच्या विश्रामगृहाचे उद्योगमंंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी काँगे्रसचे युवा नेते नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, जिल्हाधिकारी ई. रवींद्रन, महम्मद फारुखी, एमआयडीसी रत्नागिरीचे अधीक्षक राजेंद्र सोनजे, पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर, सरपंच स्रेहलता पडते, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, प्रवीण भोसले, संदेश पारकर आदी उपस्थित होते. मेहनत, क ष्ट करून, व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून उद्योग व्यवसायात उतरा आणि लहानापासून मोठे उद्योग निर्माण करा, असे आवाहन राणे यांनी केले. राज्यात गुजरात तसेच इतर राज्यातील लोक मोठे उद्योजक आहेत. जिल्ह्यातील एक तरी उद्योजक धीरूभार्इंसारखा मोठा व्हावा, अशी इच्छा राणे यांनी उपस्थित उद्योजकांसमोर व्यक्त केली. प्रत्येकाने कामात नाविन्यता आणावी, परिवर्तनाच्या प्रत्येक क्षणाची दखल घेऊन जीवनात यशस्वी भरारी घ्या, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी वास्तूविशारद माधव आंबेकर, ठेकेदार महेंद्र शर्मा तसेच अधिकाऱ्यांचा सत्कार राणेंच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने उद्योजक, एमआयडीसीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निवेदन नागेश नेमळेकर यांनी केले. (प्रतिनिधी)जनतेने अज्ञानी खासदार निवडलाज्या खासदाराला इको-सेन्सिटिव्ह म्हणजे काय ते माहीत नाही, अशा अज्ञानी खासदाराला कोकणी जनतेने निवडून दिले, अशी खंत व्यक्त करून राणेंनी खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका के ली.