Aaditya Thackeray: पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर, सिंधुदुर्गात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 14:37 IST2022-03-28T14:25:59+5:302022-03-28T14:37:24+5:30
स्वागतासाठी मालवणमध्ये शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे यामुळे भगवेमय वातावरण झाले आहे.

Aaditya Thackeray: पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर, सिंधुदुर्गात दाखल
सिंधुदुर्ग : राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे आज, सोमवार पासून तीन दिवस कोकण दौऱ्यावर आले आहेत. नुकतेच ते सिंधुदुर्ग विमानतळावर दाखल झाले असून चिपी विमानतळावरून ते मालवणच्या दिशेने रवाना झाले आहेत. मालवण येथे बंदर जेटी या ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मालवणमध्ये शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे यामुळे भगवेमय वातावरण झाले आहे.
राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रात विविध विकासात्मक कामांसाठी दौरा करत आहेत. त्याचा प्रारंभ कोकणातून करण्यात आला आहे. आज, सोमवारपासून पुढील तीन दिवस ते सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड दौऱ्यावर असणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटनाचा कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत होणार आहे.