Sindhudurg: प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर अत्याचार, संशयित तिघांना अटक 

By सुधीर राणे | Updated: October 20, 2023 16:45 IST2023-10-20T16:44:40+5:302023-10-20T16:45:05+5:30

वाईन प्यायला लावून संशयितांनी पीडित तरुणीवर अत्याचार केले

Torture of a young woman by dragging her into the net of love, three suspects arrested in Kankavli | Sindhudurg: प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर अत्याचार, संशयित तिघांना अटक 

Sindhudurg: प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर अत्याचार, संशयित तिघांना अटक 

कणकवली: दोन महिन्यापूर्वी झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी तिचा मित्र व अन्य दोघांवर कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संशयित तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. 

बाळकृष्ण उर्फ बाळू सदानंद तांबे (वय-२६, रा. नाद, बौद्धवाडी), शैलेश शांताराम तांबे (३४,रा.दारुम), गणेश प्रकाश गुरव (२४,रा.शिरवली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत त्या पीडित तरुणीने कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित तरुणीची बाळकृष्ण तांबे याच्याबरोबर ओळख झाली होती. कालांतराने त्याचे प्रेमात रूपांतर झाले. पीडित तरुणी बाळकृष्ण याला भेटायला तळेरे येथे आली. या दोघांनी नातेवाईकांना आपल्याला लग्न करायचे असल्याचे सांगितले. यावेळी नातेवाईकांनी तरुणीला नंतर बघूया. तू घरी जा असे सांगितले. त्यानंतर बाळकृष्ण त्या तरुणीला घेऊन तळेरे येथे आला अन् तेथून निघून गेला. 

काही वेळाने बाळकृष्णने परत येत तरुणीला वाईन प्यायला लावली. अन् संशयित तिघांनी तिच्यावर अत्याचार करुन तिला तिच्या घराजवळ सोडले. तीने घडलेल्या प्रकाराबद्दल कुटुंबियांना माहिती दिली. तसेच कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्या तिघांवर गुन्हा नोंद करून त्यांना गुरुवारी रात्री अटक केली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर सावंत व कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव करत आहेत.

Web Title: Torture of a young woman by dragging her into the net of love, three suspects arrested in Kankavli