'टोल'मधील झोल! चाकरमान्याकडूनच पोलखोल,शासनाकडून टोल माफी पण प्रत्यक्षात ऑनलाईन वसुली, सावंतवाडीतील महादेव पवार यांना फटका 

By अनंत खं.जाधव | Updated: August 28, 2025 14:03 IST2025-08-28T14:00:10+5:302025-08-28T14:03:18+5:30

Ganesh Chaturthi News: गणेश चतुर्थी निमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारकडून मोठमोठ्या घोषणा करण्यात येतत पण या घोषणा लोकप्रियतेसाठी असल्याचा प्रत्यय आला असून  चाकरमान्यांची टोलमाफी फक्त कागदावरच राहिली असून टोल मध्ये झालेलया झोलची सावंतवाडीतील महादेव पवार यांनी पोलखोल केली आहे.

Toll scam! The government itself exposed the issue, toll waiver but in reality online collection, Mahadev Pawar from Sawantwadi gets hit | 'टोल'मधील झोल! चाकरमान्याकडूनच पोलखोल,शासनाकडून टोल माफी पण प्रत्यक्षात ऑनलाईन वसुली, सावंतवाडीतील महादेव पवार यांना फटका 

'टोल'मधील झोल! चाकरमान्याकडूनच पोलखोल,शासनाकडून टोल माफी पण प्रत्यक्षात ऑनलाईन वसुली, सावंतवाडीतील महादेव पवार यांना फटका 

सावंतवाडी -  गणेश चतुर्थी निमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारकडून मोठमोठ्या घोषणा करण्यात येतत पण या घोषणा लोकप्रियतेसाठी असल्याचा प्रत्यय आला असून  चाकरमान्यांची टोलमाफी फक्त कागदावरच राहिली असून टोल मध्ये झालेलया झोलची सावंतवाडीतील महादेव पवार यांनी पोलखोल केली आहे.

पुणे धानोरी येथील मनोहर पवार हे  पुण्याहून सावंतवाडी कडे येत असतना त्यांनी टोल माफीचा परवाना पोलिस ठाण्यातून देण्यात आला होता. पण टोल चा परवाना असतनाही त्याच्या बॅक खात्यातील रक्कम टोल साठी ऑनलाईन पध्दतीने गेल्याचे दिसून आली  त्यामुळे सरकार ची चाकरमान्यासाठी केलेली टोल ची घोषणा फक्त कागदावरची असल्याचा अनुभव पवार यांना आला आहे.
 पुणे धानोरी येथून येणारे चाकरमानी मनोहर पवार यांना पुणे विश्रांतवाडी पोलीस चौकी मधून पथकर माफी चा पास देण्यात आला होता. हा परवाना मिळवण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी सुद्धा केली होती.यावेळी कुठून कुठे पर्यंत प्रवास करणार कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत प्रवास करणार याबाबतची इत्यंभूत माहिती या अधिकाऱ्यानी नोंदवून घेतली होती.व तसा रितसर परवाना ही देण्यात आला होता.

पण हा परवाना घेऊन जेव्हा मनोहर पवार पुणे वरून सावंतवाडी कडे येण्यास निघाले तेव्हा भलताच प्रकार घडला त्यांनी टोल दाखवून प्रत्यक्षात प्रवास सुरू केला तेव्हा आपला टोल माफीचा पास दाखवला असता त्याना टोल नाक्यावरून जाण्याची परवानगी दिली मात्र त्यांची कार टोल वरून पास झाल्यानंतर काहि अंतराने त्याच्या बॅक खात्यातून पैसे गेल्याचे निर्दशनास आले हा सर्व प्रकार पुणे येथील खेड शिवापुर टोल नाका त्यानंतर आणेवाडी टोल नाका मिळाला त्यानंतर तसवडे टोल नाक्यावर अनुभवण्यास मिळाला.

मनोहर पवार याचे तब्बल 285 रूपये खात्यामधून वळते करण्यात आले आहेत या प्रकरणातून गणेश चतुर्थीला कोकणवासी यांना खुष करण्यासाठी राज्य सरकार विविध घोषणा करते या घोषणा फक्त कागदावरच अंमलात येतात हे सिध्द झाले असून असे अनेक कोकवासी आहेत त्याना या टोल मधील झोल चा फटका बसला आहे.यावर त्यामुळे आता सरकार टोल चे पैसे पुन्हा या प्रवाशांना देणार काय हे बघावे लागणार आहे.

टोल माफी मग पैसे मागे द्या : पवार 
चाकरमान्यांसाठी टोल माफीची घोषणा केली जाते मात्र प्रत्यक्षात ही टोल माफी चाकरमान्याना मिळत नाही उलट त्यांना टोल द्यावा लागतो   हे पैसे ऑनलाईन पध्दतीने बॅक खात्यातून गेले आहेत त्याची भरपाई व्हावी अशी मागणी मनोहर पवार यांनी केली आहे.

Web Title: Toll scam! The government itself exposed the issue, toll waiver but in reality online collection, Mahadev Pawar from Sawantwadi gets hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.