शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव टोलनाक्यावर आजपासून टोल वसुली?, वाहन चालकांमध्ये संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 13:06 IST

सिंधुदुर्गवासीयांसाठी टोलमुक्ती हवेतच विरणार

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव टोलनाक्यावर टोलवसुली करण्याकरिता ठेकेदार कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. त्यामध्ये १ डिसेंबर २०२२ पासून टोल वसुली होणार असल्याचे नमूद केले आहे. मात्र, राजकीय पक्षांकडून सिंधुदुर्गातील वाहनांना टोल माफ करावा,अशी मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर टोल वसुली लगेचच सूरु होणार का? याबाबत वाहन चालकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विकास कामे होण्याकरिता टोल द्यावा लागणार असल्याची भूमिका अलीकडेच मांडली होती. तर त्याला मनसे,राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विरोध केला आहे.ओसरगाव येथील टोलनाक्यावर टोलवसुलीसाठी कंत्राट दिलेल्या ठेकेदार कंपनीकडून दिवसाला ७ लाख ५२ हजार ३७८ रुपये टोलवसुली केली जाणार आहे. टोलवसुली प्रत्यक्ष सुरु केल्यापासून तीन महिन्यापर्यंत या ठेकेदार कंपनीचा ठेक्याचा कालावधी असणार आहे. दिवसाला या कंपनीकडून किती टोलवसुली केली जाते? अन्य बाबींची कितपत पुर्तता केली जाते यावरच रिटेंडर किंवा याच कंपनीला पुन्हा ठेका द्यायचा की नाही हे अवलंबून असणार आहे.टोलवसुलीचे कंत्राट मिळालेल्या गणेश गढीया कन्स्ट्रक्शन कंपनीने क्षेत्रीय कार्यालयाकडे अनामत रक्कम भरल्यानंतर या कंपनीला रितसर कार्यरंभ आदेश देत टोल वसुलीची जाहीर नोटीस प्रसिद्धी केली आहे. या टोलवसुलीचे दर कुठल्या वाहनांना किती असणार आहेत? याबाबत जनतेला माहिती होण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाकडून नोटीस प्रसिध्द करण्यात आली आहे.सिंधुदुर्गवासीयांसाठी टोलमुक्ती हवेतच विरणारत्यानुसार स्थानिक खासगी वाहनांना ३१५ रुपये दर महिना पास असणार आहे. तर एकावेळेसाठी ९० रुपये ते ५८५ रुपये एवढी रक्कम इतर वाहनांना आकारण्यात येणार आहे.त्यामुळेजिल्हयातील राजकीय पक्षांनी सिंधुदुर्ग पासिंगच्या वाहनांना १०० टक्के टोलमाफी देण्याची मागणी करत यापूर्वी आंदोलने केली होती. मात्र ,त्याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. स्थानिक वाहनांना  ३१५ रुपयांचा पास दिला जाणार आहे.  महामार्गावरुन जाणार्‍या- येणार्‍या वाहनचालकांना आता टोलचा भुर्दंड बसणार, हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून सिंधुदुर्ग जिल्हा पासिंग असलेल्या वाहनाना टोल मुक्ती देण्याच्या घोषणा हवेतच विरण्याची भीती निर्माण झाली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtollplazaटोलनाका