शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

तेंडोली येथे बिबट्यास जीवदान

By admin | Updated: July 19, 2015 00:31 IST

अजून तीन बिबटे

कुडाळ : तालुक्यातील तेंडोली-कुंभारवाडी येथे शुक्रवारी रात्री कुत्र्याला पकडण्याच्या नादात विहिरीत पडलेल्या दोन वर्षीय मादी बिबट्याला वनविभागाने पिंजऱ्यात पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. शुक्रवारी रात्री भक्ष्याच्या शोधात बिबट्या तेंडोली येथील कुंभारवाडीमध्ये आला. याचवेळी तेथे एक कुत्रा फिरताना दिसला. त्याने त्या कुत्र्याचा पाठलाग सुरू केला. बिबट्याला पाहून कुत्रा धावत असताना तेथीलच सगुण तेंडोलकर यांच्या घराशेजारील कठडा नसलेल्या विहिरीत कुत्रा पडला. कुत्र्याच्या मागोमाग धावणारा बिबट्या त्या विहिरीत पडला. (पान ८वर) विहिरीत पाण्याची पातळी कमी होती. त्यामुळे बिबट्या व कुत्रा हे दोघेही सकाळपर्यंत जिवंत राहिले. विहिरीत पडल्यामुळे व बिबट्यासमोर असल्याने कुत्रा जोरजोरात भुंकत होता. त्यामुळे विहिरीत बिबट्या पडला असल्याची माहिती तेथील ग्रामस्थांना मिळाली. त्यांनी ती वनविभागाला दिली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कुडाळ वनक्षेत्रपाल संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाने मोहीम सुरू केली. प्रथम कुत्र्याला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अथक परिश्रमाने बिबट्याला सुरक्षितरीत्या पिंजऱ्यात कैद करण्यात आले. कमी वेळात सुयोग्य नियोजनाने ही मोहीम राबविण्यात आली. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे कुडाळ वनक्षेत्रपाल संजय कदम, मठ वनपाल वि. अ. मसुरकर, नेरूर वनपाल कृष्णा कदम, वनरक्षक तानाजी दळवी, सुरेश मेथर, सावळा कांबळे, हरी राठोड, किशोर परुळेकर, लक्ष्मण आगलावे, गुरुनाथ मयेकर यांच्याबरोबर तेंडोलीतील काही ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली. दरम्यान, कुडाळमध्ये या बिबट्याला आणल्यानंतर त्याची प्राथमिक तपासणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली. हा बिबट्या मादी असल्याचे सांगून प्रकृती चांगली असल्याचे सांगितले. पकडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नैसर्गिक अधिवासात सोडले. (प्रतिनिधी)