आंबोलीत कार नाल्यात कोसळल्याने अपघात, कर्नाटकातील तिघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 09:46 IST2022-03-11T09:46:37+5:302022-03-11T09:46:46+5:30
रात्री तीन वाजेच्या सूमारास घडला अपघात, ग्रामस्थ मदतीला धावले

आंबोलीत कार नाल्यात कोसळल्याने अपघात, कर्नाटकातील तिघे गंभीर जखमी
आंबोली: अनियंत्रित कार नाल्यामध्ये पडल्याने तिघे जखमी झाल्याची घटना घडली आहे. चालकाचा अंदाज चुकल्याने आंबोली येथील मुळवंदवाडी परिसरातील नाल्यात दहा ते बारा फुट खोल कार कोसळल्याचा प्रकार रात्री घडला. या अपघातात कर्नाटक येथील तिघे जखमी झाले आहेत.
हा अपघात गुरूवारी रात्री घडला. जखमींना अधिक उपचारासाठी अन्यत्र हलविण्यात आले आहे. रमेश तावडे, शिवसेनेचे उपविभाग प्रमुख उत्तम पारधी यांनी जखमींना मदत केली. यानंतर 108 रुग्णवाहिका बोलावून आंबोली आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. बेळगाव येथून गोव्याकडे जात असताना रात्री अपघात घडला. अद्याप जखमींची नावे समजू शकली नाही.