सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर दोन दिवसात तीन व्हेल मृतावस्थेत... समुद्रातील वादळाचा भल्यामोठ्या जीवाला तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 20:04 IST2025-10-30T20:02:53+5:302025-10-30T20:04:13+5:30
Dead Whales Sindhudurg Coast: सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर दोन दिवसात तीन मृत व्हेच आढळून आले आहेत.

सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर दोन दिवसात तीन व्हेल मृतावस्थेत... समुद्रातील वादळाचा भल्यामोठ्या जीवाला तडाखा
सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर दोन दिवसात तीन मृत व्हेच आढळून आले आहेत. सिंधुदुर्ग किल्ला, वायंगणी वेंगुर्ला, आणि कोंडुरा येथे हे मृतावस्थेतील व्हेल सापडले आहेत. सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे ते व्हेलच्या नेमक्या कोणत्या प्रजातीचे आहे, हे सांगता येत नसल्याचे सागरी जीव शास्त्रांनी सांगितले. दरम्यान समुद्रात आलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात हे भलेमोठे जीव सापडले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. येथील किल्ले सिंधुदुर्ग नजीकच्या खडकाळ भागात गुरुवारी सकाळी भलामोठा शार्कचा कुजलेल्या अवस्थेतील सांगाडा अडकला असल्याचे दिसून आले. मात्र, समुद्र खवळलेला असल्याने संबंधित यंत्रणेला तेथपर्यंत पोचणे कठीण बनले आहे.
समुद्रातील वादळ सदृश परिस्थितीमुळे गेले काही दिवस किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. काल रात्री मुसळधार पाऊस कोसळला. समुद्राला आलेल्या उधाणात मध्यरात्री किल्ले सिंधुदुर्ग लगतच्या खडकाळ भागात एक भलामोठा कुजलेल्या अवस्थेतील शार्कचा सांगाडा अडकला. आज सकाळी किल्ल्यातील स्थानिक रहिवासी व किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांना हा मृत सांगाडा दिसून आला. सुमारे १५ ते १७ फूट लांबीचा सी शव असून ते पूर्णतः कुजले आहे. याचा तोंडाचा भाग अस्तित्वात नाही तर अन्य भागाचा सांगाडा व मांस असल्याचे दिसून येत आहे.
सध्या समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे या शवाची विल्हेवाट लावण्यास संबंधित यंत्रणा तेथपर्यंत पोचणे कठीण आहे. समुद्राला पुन्हा उधाण आल्यास हा सांगाडा पुन्हा समुद्रात वाहून जाण्याची शक्यताही श्री. सावंत यांनी वर्तविली आहे. याचा प्रमाणे वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी आणि कोंडुरा येथेही दोन व्हेल मृतावस्थेत किनाऱ्यावर वाहून आले आहेत. आहे सर्व व्हेल ३० ते ४० फूट लांब आहेत. दरम्यान सागरी जीव शास्त्रांशी संपर्क साधला असता हे शव व्हेलचे वाटत असले तरीही ते व्हेलच्या नेमक्या कोणत्या प्रजातीचे आहे हे सांगता येत नसल्याचे म्हणाले.