शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

हजार शिक्षकांचे ओझे दोघांवर

By admin | Updated: January 9, 2015 00:10 IST

पंचायत समिती : रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी

रहिम दलाल - रत्नागिरी  -रत्नागिरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील १००० शिक्षकांच्या कामाचा संपूर्ण भार केवळ दोन क्लार्कवर आहे़ त्यामुळे या विभागातील दोन्ही कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे़ रत्नागिरी पंचायत समिती शिक्षण विभागासाठी १००० शिक्षक पदे मंजूर असून, त्यापैकी ९५७ शिक्षक कार्यरत आहेत़ या १००० शिक्षकांच्या आस्थापनेसाठी ५ क्लार्कची पदे मंजूर आहेत़ मात्र, त्यापैकी केवळ दोन पदे भरण्यात आली आहेत़ उर्वरित तीन पदे रिक्त आहेत़ तसेच तालुक्यातील ६ बीटसाठी तेवढेच विस्तार अधिकारी मंजूर आहेत़ मात्र, त्यापैकी केवळ ४ विस्तार अधिकारी कार्यरत असून, दोन पदे रिक्त आहेत़ विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविले जातात़ त्याचबरोबर शिक्षकांची पगार बिले काढणे, प्रॉव्हिडंड फंडाची कामे करणे, विविध शासकीय योजनांचे कामे व अन्य कामे त्या क्लार्कना करावी लागतात़ ही कामे करताना दोन्ही क्लार्कची दमछाक होत आहे.तालुक्यामध्ये प्रत्येक माध्यमिक शाळेसाठी एका क्लार्कची नियुक्ती करण्यात येते़ मात्र, तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ३४६ प्राथमिक शाळांसाठी केवळ २ क्लार्क कार्यरत आहेत. या दोन्ही क्लार्कना दररोज सायंकाळी उशिरापर्यंत थांबून काम करावे लागते़ विस्तार अधिकाऱ्यांची २ पदे रिक्त आहेत़ विस्तार अधिकाऱ्यांना शाळांना भेटी द्यावा लागतात़ कार्यरत असलेल्या ४ अधिकाऱ्यांवर तालुक्याचा भार असल्याने तेही हैराण झाले आहेत़ विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येतो़ त्या पोषण आहाराच्या कामकाजासाठी अधीक्षक पदाची नियुक्ती करण्यात आली आहे़ मात्र, हेही पद रिक्त असल्याने अधीक्षकाचे कामही या दोन्ही क्लार्कना करावे लागते. तालुक्यातील १००० शिक्षकांचा भार केवळ दोन क्लार्कवर मदार असल्याने त्यांची दमछाक होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत शिक्षक़वर्गातून व्यक्त होत आहे.रिक्त असलेल्या पदांमुळे पंचायत समितीचा शिक्षण विभाग मेटाकुटीला आला आहे़ ही रिक्त पदे भरण्याबाबत पंचायत समितीकडून जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे अनेकदा मागणी करण्यात आली आहे़ (शहर वार्ताहर)रोखपाल नियुक्त मात्र...शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सर्वशिक्षा अभियान राबविण्यात येत आहे़ त्यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात रोखपालची नियुक्त करण्यात आली आहे़ मात्र, या पदावरील रोखपाल गेले सहा महिने रजेवर आहेत़ या रोखपालाच्या कामांचा भारही या दोन क्लार्कना उचलावा लागत आहे़ हे चित्र बदलणार कधी?