शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Nitesh Rane: शिवरायांना नव्हे हे तर औरंगजेबला मानणारे, आमदार नितेश राणेंचे राज्य सरकार टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 17:01 IST

जर आम्ही रातोरात पुतळा हलवला आणि योग्य जागी बसवला तर आमच्यावर गुन्हे दाखल करायचे नाहीत

कणकवली : पालकमंत्री उदय सामंत यांनी कणकवलीतील सर्व्हिस रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित करण्यासंदर्भात नागरिकांना शब्द दिला होता. पण अद्याप पुतळ्याचे स्थलांतरण झाले नसल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी उपोषणाचा पर्याय निवडला आहे. या उपोषणाला आमदार नितेश राणे यांनी पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी राज्यसरकारवर हल्लाबोल चढवला. शिवरायांना नव्हे हे तर औरंगजेबला मानणारे राज्य सरकार असल्याची टीका आमदार राणे यांनी केली.कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहर भाजपच्यावतीने सुरू असलेल्या उपोषणाला आमदार नितेश राणे यांनी पाठिंबा दिला.  उपोषणस्थळी त्यांनी भेट देऊन कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची चौकशी केली. यावेळी ते म्हणाले, पालकमंत्र्यांच्या शब्दाला जर प्रशासन किंमत देत नसेल तर कायदा व सुव्यवस्था राखणे ही केवळ आमची जबाबदारी नाही. जर आम्ही रातोरात पुतळा हलवला आणि योग्य जागी बसवला तर आमच्यावर गुन्हे दाखल करायचे नाहीत, असा इशारा देखील आमदार राणे यांनी दिला.जिल्ह्यात तांडव निर्माण झाले तर...छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा आम्हाला कोणी मोठे नाही.  पालकमंत्र्यांची राज्य सरकार मध्ये काय किंमत आहे? ते बघण्यासाठी अजून पर्यंत आम्ही थांबलो होतो. मात्र, आता थांबणार नाही. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईपर्यंत आम्ही काही हात बांधून गप्प बसत पाहत राहणार नाही. आमच्या पदाची आम्हाला चिंता नाही. पुतळा स्थलांतरित करण्याच्या मुद्द्यावरून जर जिल्ह्यात तांडव निर्माण झाले तर आमची त्याला तयारी आहे. असा इशारा देखील राणे यांनी दिला.यावेळी भाजपचे कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे, प्राची कर्पे, प्रज्ञा ढवण, मेघा गांगण राजश्री धुमाळे, साक्षी वाळके, पप्पू पुजारे, शिवसुंदर देसाई, अभय घाडीगावकर, संदीप सावंत, राजू हिर्लेकर, राजन चिके, महेश सावंत, अभिजीत मुसळे, बंडू गांगण, संजय ठाकूर भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे आदी उपस्थित होते. यावेळी पुतळ्याच्या प्रस्तावित जागेची देखील आमदार राणे यांनी पाहणी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUday Samantउदय सामंत