कुसूर येथील २ मंदिरातील दानपेट्यांवर चोरट्यांचा डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 14:35 IST2022-03-05T14:35:21+5:302022-03-05T14:35:44+5:30

वैभववाडी : कुसुर येथील रामेश्वर व दारुबाई मंदिरातील २ दानपेट्या फोडून अज्ञात चोरट्यांनी आतील रक्कम लंपास केली आहे. हा ...

Thieves raid donation boxes in 2 temples at Kusur | कुसूर येथील २ मंदिरातील दानपेट्यांवर चोरट्यांचा डल्ला

कुसूर येथील २ मंदिरातील दानपेट्यांवर चोरट्यांचा डल्ला

वैभववाडी : कुसुर येथील रामेश्वर व दारुबाई मंदिरातील २ दानपेट्या फोडून अज्ञात चोरट्यांनी आतील रक्कम लंपास केली आहे. हा प्रकार आज, शनिवारी सकाळच्या सुमारास ग्रामस्थांच्या निदर्शनास आला.

दरम्यान फोडलेल्या दानपेट्या संबंधित चोरट्यांनी मंदिराच्या मागील परिसरात फेकल्या. याबाबत पोलिस पाटील रवींद्र साळुंखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

चोरट्यांनी आता मंदिरातील दानपेट्यांवर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मंदिर परिसर सुरक्षतेचा मुद्दा समोर आला आहे.

Web Title: Thieves raid donation boxes in 2 temples at Kusur