शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गवासियांना दिलासा!, ओसरगाव टोलनाक्यावर टोल वसुली नाहीच, अद्याप संभ्रमच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 13:43 IST

टोलवसुली करण्याकरिता ठेकेदार कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. मात्र, टोल वसुलीच झाली नाही.

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव टोलनाक्यावर टोलवसुली करण्याकरिता ठेकेदार कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. त्यामध्ये १ डिसेंबर २०२२ पासून टोल वसुली होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, संबधित ठेकेदार कंपनीकडून गुरुवारी ओसरगाव येथे टोल वसुलीच झाली नाही. त्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.राजकीय पक्षांकडून सिंधुदुर्गातील वाहनांना टोल माफ करावा,अशी मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर टोल वसुली कधी होणार? याबाबत वाहन चालकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विकास कामे होण्याकरिता टोल द्यावा लागणार असल्याची भूमिका अलीकडेच मांडली होती. तर त्याला मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विरोध केला आहे. टोलवसुलीचे कंत्राट मिळालेल्या गणेश गढीया कन्स्ट्रक्शन कंपनीने क्षेत्रीय कार्यालयाकडे अनामत रक्कम भरल्यानंतर या कंपनीला रितसर कार्यारंभ आदेश देत टोल वसुलीची जाहीर नोटीस प्रसिद्धी केली आहे. या टोलवसुलीचे दर कुठल्या वाहनांना किती असणार आहेत? याबाबत जनतेला माहिती होण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाकडून नोटीस प्रसिध्द करण्यात आली आहे.पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तजिल्हयातील राजकीय पक्षांनी सिंधुदुर्ग पासिंगच्या वाहनांना १०० टक्के टोलमाफी देण्याची मागणी करत यापूर्वी आंदोलने केली होती. मात्र ,त्याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. त्यामुळे टोल बाबत जिल्हावासीयांमध्ये संभ्रम अजूनही कायमच आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर टोल वसुली होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ओसरगाव टोल नाक्यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtollplazaटोलनाका