शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
5
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
6
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
7
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
8
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
9
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
10
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
11
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
12
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
13
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
14
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
15
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
16
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
17
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
18
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
19
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
20
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
Daily Top 2Weekly Top 5

...तर मच्छिमारांवर कारवाई

By admin | Updated: August 1, 2015 00:36 IST

पोलीस अधिक्षकांचा इशारा : कायदा हातात घेऊ नका

मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पर्ससीन व पारंपारिक मच्छिमार यांच्यात कायम संघर्ष उद्भवतात. १ आॅगस्टपासून सर्वत्र मासेमारी सुरु होत आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी मत्स्य विभाग व बंदर विभाग अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन शुक्रवारी सूचना दिल्या आहेत. कायदा हातात घेणाऱ्या मच्छिमारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देऊन पर्ससीन किंवा पारंपरिक मच्छिमारांनी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक शिंदे यांनी केले आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मासेमारी हद्दी व विनापरवाना मासेमारी वरून समुद्रात, किनारपट्टीवर मच्छिमारांत संघर्ष भडकला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी मत्स्य विभाग व बंदर विभाग अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. याबरोबरच असे संघर्ष यापुढे घडून आल्यास कायदा हातात घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. असे सांगत सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. मालवण तालुक्यात गेल्या काही दिवसात ५ ते ६ ठिकाणी मंदिरातील फंडपेट्या चोरट्यांनी फोडल्या. याबाबत चोरट्यांचा काही सुगावा लागला का, असे विचारले असता ते म्हणाले पोलिसांच्यावतीने रात्रीची गस्त व अन्य सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या जातात. मात्र, गावागावात मंदिरांची मोठी संख्या आहे. याठिकाणी असणाऱ्या चीज वस्तू यांच्या संरक्षणा बाबत मंदिर प्रशासनाने जागरूकता दाखवणे गरजेचे आहे. असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)गस्ती नौका १ सप्टेंबरपासूनसमुद्री सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांच्या गस्तीनौका या महत्वाच्या भूमिका बजावतात. शासनाचा मासेमारी बंदी कालावधी ३१ जुलैला संपत असून १ आॅगस्ट पासून मासेमारी सुरु होणार आहे. समुद्रातील हवामान नारळी पौर्णिमेपर्यंत पोषक नसल्याने पोलिसांच्या गस्ती नौका १ सप्टेंबरपासून नेहमीप्रमाणे सुरु होतील, असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. समुद्रात काही संशयास्पद जहाज व अन्य संशयास्पद वस्तू दिसून आल्यास १०९३ या टोल फ्री नंबर वर संपर्क साधावा.पोलीस स्थानक, मत्स्य, बंदर कार्यालयांना भेट जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शिंदे यांनी प्रथमच मालवण पोलीस ठाण्यास भेट दिली. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पर्ससीन व पारंपारिक मच्छिमार यांच्यात कायम संघर्ष उदभवतात. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी मत्स्य विभाग व बंदर विभाग अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन शुक्रवारी सूचना दिल्या आहेत.