Theft at a grocery store in Malvan market | मालवण बाजारपेठेतील किराणा दुकानात चोरी

मालवण बाजारपेठेतील किराणा दुकानात चोरी

ठळक मुद्देमालवण बाजारपेठेतील किराणा दुकानात चोरी रोख रक्कम केली लंपास : गुरुवारी पहाटेची घटना

मालवण : मालवण बाजारपेठेतील नाना पारकर यांच्या पारकर किराणा मर्चंट या दुकानाच्या छप्पराची कौले काढून अज्ञात चोरट्यांने दुकानात प्रवेश करीत दुकानातील ड्रॉव्हर फोडून ७ ते ८ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची माहिती दुकानाचे मालक ज्येष्ठ व्यापारी नाना पारकर यांनी दिली आहे.

बाजारपेठेत चोरी झाल्याने व्यापारी आणि नागरिकांत खळबळ उडाली आहे. ही चोरी गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहितीही नाना पारकर यांनी दिली आहे.

Web Title: Theft at a grocery store in Malvan market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.