मालवण बाजारपेठेतील किराणा दुकानात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 11:33 IST2021-02-25T11:32:22+5:302021-02-25T11:33:22+5:30
Crimenews Sindhudurg- मालवण बाजारपेठेतील नाना पारकर यांच्या पारकर किराणा मर्चंट या दुकानाच्या छप्पराची कौले काढून अज्ञात चोरट्यांने दुकानात प्रवेश करीत दुकानातील ड्रॉव्हर फोडून ७ ते ८ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची माहिती दुकानाचे मालक ज्येष्ठ व्यापारी नाना पारकर यांनी दिली आहे.

मालवण बाजारपेठेतील किराणा दुकानात चोरी
ठळक मुद्देमालवण बाजारपेठेतील किराणा दुकानात चोरी रोख रक्कम केली लंपास : गुरुवारी पहाटेची घटना
मालवण : मालवण बाजारपेठेतील नाना पारकर यांच्या पारकर किराणा मर्चंट या दुकानाच्या छप्पराची कौले काढून अज्ञात चोरट्यांने दुकानात प्रवेश करीत दुकानातील ड्रॉव्हर फोडून ७ ते ८ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची माहिती दुकानाचे मालक ज्येष्ठ व्यापारी नाना पारकर यांनी दिली आहे.
बाजारपेठेत चोरी झाल्याने व्यापारी आणि नागरिकांत खळबळ उडाली आहे. ही चोरी गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहितीही नाना पारकर यांनी दिली आहे.