ढगफुटीसदृश्य पावसामुळे भुईबावडा घाटात रस्त्याला भगदाड, कोसळलेल्या दरडी हटविण्याचे काम सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 13:48 IST2024-09-24T13:47:21+5:302024-09-24T13:48:18+5:30
प्रकाश काळे वैभववाडी ( सिंधुदुर्ग ): सह्याद्री पट्यात काल, सोमवारी (ता.२३) सायंकाळी झालेल्या ढगफुटीने भुईबावडा घाटमार्गाची दाणादाण उडविली आहे. ...

ढगफुटीसदृश्य पावसामुळे भुईबावडा घाटात रस्त्याला भगदाड, कोसळलेल्या दरडी हटविण्याचे काम सुरु
प्रकाश काळे
वैभववाडी (सिंधुदुर्ग): सह्याद्री पट्यात काल, सोमवारी (ता.२३) सायंकाळी झालेल्या ढगफुटीने भुईबावडा घाटमार्गाची दाणादाण उडविली आहे. घाटात दहा-बारा ठिकाणी दरडी कोसळल्या असून एका ठिकाणी रस्ता खचून भगदाड पडले आहे.
सोमवारी सायंकाळी सुमारे दीड तास ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे भुईबावडा दहा-बारा ठिकाणी दरडी कोसळल्या. या दरडींचे ढीगारे दोन जेसीबीच्या सहाय्याने हटविण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत घाटमार्ग वाहतुकीस खुला होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ढगफुटीमुळे भुईबावडा घाटातील रस्ता खचला आहे. त्यामुळे सुमारे १५ ते २० फूट लांब भगदाड पडले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत तेथून एकेरी वाहतूक सुरु ठेवावी लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विनायक जोशी, कनिष्ठ अभियंता शुभम दुडये घाटातील कोसळलेल्या दरडी हटविण्याच्या कामावर लक्ष ठेवून आहेत.