पार्श्वनाथ बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक अटकेत, आज न्यायालयात हजर करणार; कोल्हापुरात कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 14:24 IST2022-04-08T13:57:21+5:302022-04-08T14:24:19+5:30
बँकेची वाढीव मूल्यांकनाच्या आधारे ७२ लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

पार्श्वनाथ बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक अटकेत, आज न्यायालयात हजर करणार; कोल्हापुरात कारवाई
कणकवली : कणकवली शहरातील पार्श्वनाथ को. ऑप. बँक लि. कोल्हापूर, शाखा कणकवली या बँकेची वाढीव मूल्यांकनाच्या आधारे ७२ लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी कर्जदार अशोक रघुनाथ सावंत (४८, नाटळ) याला गुरुवारी सायंकाळी अटक केली.
त्याच दरम्यान मुख्य आरोपी तत्कालीन शाखाधिकारी किशोर चंद्रकांत गुंजीकर (५१, कोल्हापूर) याला कोल्हापुरात ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी कोल्हापुरात कारवाई केली आहे. या दोन्ही आरोपींना आज, शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
कणकवली शहरातील पार्श्वनाथ को. ऑप. बँक लि. कोल्हापूर, या बँकेचे प्रेमानंद महादेव सावंत, रा.नाटळ हे सहकर्जदार आहेत. कर्ज घेताना त्यांच्या शेतजमिनीचे अवास्तव बनावट मूल्यांकन संगनमताने करून परस्पर बँकेची ७२ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.
याप्रकरणी बँकेचे तत्कालीन शाखाधिकारी किशोर चंद्रकांत गुंजीकर, तत्कालीन रोखापाल अनुश्री नितीन गावडे (रा. सावंतवाडी), कर्जदार अशोक रघुनाथ सावंत आणि प्रथमेश सावंत (रा. कणकवली) यांच्याविरूध्द कणकवली पोलीस ठाण्यात लेखाधिकाऱ्यानी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.