Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत

By अनंत खं.जाधव | Updated: April 25, 2025 17:21 IST2025-04-25T17:20:24+5:302025-04-25T17:21:35+5:30

आंबोली: पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा ...

The message the Indian government has given to Pakistan after the terrorist attack in Pahalgam is correct but, Sharad Pawar expressed his clear opinion | Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत

Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत

आंबोली: पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत राहिले पाहिजे. पण सरकारने एखादा निर्णय घेतना त्याचा भारतावरच उलटा परिणाम होणार नाही? याची दक्षता घेतली पाहिजे असे मत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी मांडले. ते आंबोली येथील ऊस संशोधन केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी एखाद्या पर्यटकाला त्याचा धर्म विचारून मारणे हे भयंकर कृत्य असल्याचे सांगितले.

पवार गुरूवार पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौऱ्यावर होते. आज, शुक्रवारी त्यांनी आंबोली नांगरतास येथील ऊस संशोधन केंद्राला भेट देऊन संशोधकासोबत बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बॅक संचालक व्हिक्टर डाॅन्टस, माजी मंत्री प्रविण भोसले, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, ऊस सशोधन केंद्राचे प्रमुख अधिकारी प्रभाकर देशमुख उपस्थित होते.

परिस्थीतीचे गांभीर्य ओळखले पाहिजे

पहलगाम येथील हल्याबाबत पवार यांनी चिंता व्यक्त केली. धर्म विचारून एखाद्या पुरूषाला मारणे म्हणजे परिस्थीतीचे गांभीर्य ओळखले पाहिजे. जे काही लोक धर्माबाबत अधिक बोलतात त्यांनाच सरकार पाठिंबा देते हे योग्य नसल्याचे पवार यांनी म्हटले.

एखादा निर्णय घेतला तर तडीस न्यावा

पहलगाममध्ये घडलेल्या घटनेनंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला आमच्या पक्षाकडून लोकसभेतील नेत्या सुप्रिया सुळे यांना पाठवण्यात आले होते. त्यामुळेच सरकार जो काही निर्णय घेईल त्याला आम्ही पाठिंबा दिला असून सर्वजण सरकार सोबत आहोत. हल्ला भारतावर झालेला आहे त्यामुळेच सरकारला पाठिंबा देणे गरजेचे आहे. पण सरकारने ही पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावे. एखादा निर्णय घेतला तर तडीस न्यावा असे आवाहन पवार यांनी केले. 

काही निर्णय विचार करून घेतले पाहिजेत 

हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून पाकिस्तानवर काही निर्बंध लादण्यात आले आहेत, पण हे निर्बंध लादत असताना सरकारने थोडासा विचार केला पाहिजे. भारताची विमानसेवा जर पाकिस्तानातून जात असताना बंद केली तर त्याचा परिणाम भारतावरच होईल असे अनेक निर्णय आहेत. पण यातून पाकिस्तानला ही एक संदेश जाईल असेही पवार म्हणाले.

पवार म्हणाले, वेंगुर्ले येथील फळ संशोधन केंद्रात काजूवर नवनवीन प्रकिया उद्योग उभे राहत आहेत याची माहिती घेतली  हे भूषणावह आहे. असे असे असले तरी काजू पिकांबाबत जनतेत किती उत्साह आहे. हेही  तपासून घेतले पाहिजे. पण संशोधनाचे काम चांगले चालले असल्याचे पवार यांनी म्हटले.

Web Title: The message the Indian government has given to Pakistan after the terrorist attack in Pahalgam is correct but, Sharad Pawar expressed his clear opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.