शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

समानता, एकात्मतेचा संदेश; कुडाळमध्ये पुरुषांनी साजरी केली आगळीवेगळी वटपौर्णिमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 17:01 IST

विशेष म्हणजे गेली 12 वर्षे पुरुष साजरी करत आहेत वटपौर्णिमा

कुडाळ : जन्मोजन्मी हिच पत्नी मिळावी, पत्नीला चांगले आरोग्य व दीर्घायुष्य मिळावे या करीता तसेच एकात्मिकता व समानतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने कुडाळ मधील पुरूषांनी आगळी वेगळी पुरुषांची वटपौर्णिमा याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली. विशेष म्हणजे गेली 12 वर्षे ही वटपौर्णिमा साजरी केली जात आहे.जन्मोजन्मी हाच पती लाभो, दीर्घायुष्य लाभो या करीता वटपोर्णिमा हा सण महीला मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. या वरून स्फूर्ती घेऊन बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर व कुडाळ येथील प्रसिध्द स्त्री रोगतज्ञ डॉ. संजय निगुडकर व त्यांच्या सहकार्यांतर्फे 2010 पासून कुडाळ गवळदेव मंदिर येथे पुरुषांची वटपौर्णिमा साजरी येथे केली जाते.या वर्षीही श्री देव गवळदेव मंदिर येथे उमेश गाळवणकर, डॉ. संजय निगुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. डॉ.सुरज शुक्ला , डॉ.व्यंकटेश भंडारी, प्रा.अरुण मर्गज,प्रा. परेश धावडे, प्रा.प्रथमेश हरमलकर, राजू कलिंगण, जांभळे, सुरेश वरक, पालव, प्रसाद कानडे, संतोष पडते, सुनील गोसावी, गजा टारपे विविध क्षेत्रातील पुरूषांनी मोठ्या उत्साहात वडाला सात फेर्‍या मारून ,वटपूजा करून पत्नीच्या निरोगी, दीर्घ आयुष्यासाठी परमेश्वराकडे मागणे मागून वटपौर्णिमा साजरी करीत आपल्या सुविद्य पत्नीची साथ, सहकार्य जन्मोजन्मी मिळावे अशा प्रकारचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हा उप्रकम स्त्री-पुरुष समानतेचे एक मूर्तिमंत प्रतीक आहे.समानता, एकात्मता ही भावना जोपासण्याचा प्रयत्नपतीचे आरोग्य चांगले राहो, दीर्घायुष्य लाभो या करीता महीला शेतीसाठी वटपोर्णिमा व्रत करतात. त्याच प्रमाणे पत्नीच्या चांगल्या आरोग्य व दीर्घायुष्या साठी आम्ही ही या ठिकाणी वटपोर्णिमा साजरी करीत असुन खर्या अर्थाने स्त्री पुरूष समानता, एकात्मता ही भावना जोपासत असल्याचे सांगितले.कृतज्ञता, प्रेम, आदर व्यक्त करण्याची संधीस्त्री रोगतज्ञ डाॅ. संजय निगुडकर यांनी सांगितले की, आम्हाला ही पत्नीने दिलेल्या योगदाना बद्दल कृतज्ञता, प्रेम, आदर व्यक्त करण्याची एक संधी उमेश गाळवणकर यांच्या संकल्पनेतून मिळाली व याला दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत असुन आता अनेक ठिकाणी अशा प्रकारे हा उपक्रम साजरा होत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkudal-acकुडाळ