शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन सभेत गुन्हेगारीचा मुद्दा तापला; बीफ तस्करांवर 'मोक्का' लावण्याची निलेश राणे यांची मागणी

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 11, 2026 13:20 IST

​दारूचे हॉटस्पॉट आणि बनावट निर्मिती

​ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा आज पालकमंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. मात्र, या सभेत विकासकामांपेक्षा जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा अधिक गाजला. भाजप नेते निलेश राणे यांनी पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचा पाढा वाचत प्रशासनाला धारेवर धरले.​बीफ तस्करी आणि शेजारील राज्यांचा फटकानिलेश राणे यांनी म्हटले की, गोवा आणि कर्नाटक राज्यात बीफवर बंदी नसल्याचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसत आहे. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर गोवंश तस्करी होत असून, अशा तस्करांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी त्यांच्यावर थेट 'मोक्का' (MCOCA) अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.​दारूचे हॉटस्पॉट आणि बनावट निर्मिती"पूर्वी गोव्याची दारू जिल्ह्यात येत होती, पण आता धक्कादायक रित्या गोव्याच्या ब्रँडची दारू सिंधुदुर्गातच तयार होत आहे," असा खळबळजनक आरोप राणे यांनी केला. जिल्ह्याचे रूपांतर दारूच्या हॉटस्पॉटमध्ये होत असून, पोलीस प्रशासनाने वैभववाडी आणि दोडामार्ग सारख्या सीमावर्ती भागात CCTV यंत्रणा अधिक कडक करावी, असेही त्यांनी सुचवले.

वाचा: सिंधुदुर्गच्या अस्मितेसाठी 'एफडी' तोडा, पण शिवरायांचा पुतळा उभारा; निलेश राणेंचा प्रशासनाला कडक इशारा

​ड्रग्जचे जाळे आणि स्थानिक तरुणांचा वापरसर्वात गंभीर मुद्दा मांडताना राणे म्हणाले की, ड्रग्ज आता केवळ शहरापुरते मर्यादित राहिले नसून ते ग्रामीण भागात घराघरात पोहोचत आहे. स्थानिक तरुणांना या व्यवसायात 'डिस्ट्रिब्युशन'साठी वापरले जात आहे, जे जिल्ह्याच्या भविष्यासाठी घातक आहे. पोलिसांनी केवळ ८ कोटींची दारू पकडून थांबू नये, तर या मुळापर्यंत पोहोचून गुन्हेगारांना मोठा 'झटका' द्यावा.

​प्रशासनाचा प्रतिसादयावेळी पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या कारवाईची माहिती दिली. दोन गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून, नाका टेस्ट आणि गांजा विरोधी मोहिमेअंतर्गत कठोर पावले उचलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्र्यांनीही या प्रकरणी सीसीटीव्हीचे जाळे विस्तारण्याचे आणि सीमा तपासणी नाक्यांवर कडक बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Crime issue heats up Sindhudurg meeting; MCOCA demand for beef smugglers.

Web Summary : Sindhudurg district planning meeting addressed rising crime. Nilesh Rane demanded MCOCA for beef smugglers and stricter measures against illegal liquor and drugs, alleging local youth involvement. Police reported ongoing actions, promising increased CCTV surveillance and border checks.