सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन सभेत गुन्हेगारीचा मुद्दा तापला; बीफ तस्करांवर 'मोक्का' लावण्याची निलेश राणे यांची मागणी

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 11, 2026 13:20 IST2026-02-11T13:20:03+5:302026-02-11T13:20:39+5:30

​दारूचे हॉटस्पॉट आणि बनावट निर्मिती

The issue of crime heated up in the Sindhudurg district planning meeting; Nilesh Rane demands to impose 'Mokka' on beef smugglers | सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन सभेत गुन्हेगारीचा मुद्दा तापला; बीफ तस्करांवर 'मोक्का' लावण्याची निलेश राणे यांची मागणी

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन सभेत गुन्हेगारीचा मुद्दा तापला; बीफ तस्करांवर 'मोक्का' लावण्याची निलेश राणे यांची मागणी

​ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा आज पालकमंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. मात्र, या सभेत विकासकामांपेक्षा जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा अधिक गाजला. भाजप नेते निलेश राणे यांनी पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचा पाढा वाचत प्रशासनाला धारेवर धरले.

बीफ तस्करी आणि शेजारील राज्यांचा फटका

निलेश राणे यांनी म्हटले की, गोवा आणि कर्नाटक राज्यात बीफवर बंदी नसल्याचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसत आहे. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर गोवंश तस्करी होत असून, अशा तस्करांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी त्यांच्यावर थेट 'मोक्का' (MCOCA) अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

​दारूचे हॉटस्पॉट आणि बनावट निर्मिती

"पूर्वी गोव्याची दारू जिल्ह्यात येत होती, पण आता धक्कादायक रित्या गोव्याच्या ब्रँडची दारू सिंधुदुर्गातच तयार होत आहे," असा खळबळजनक आरोप राणे यांनी केला. जिल्ह्याचे रूपांतर दारूच्या हॉटस्पॉटमध्ये होत असून, पोलीस प्रशासनाने वैभववाडी आणि दोडामार्ग सारख्या सीमावर्ती भागात CCTV यंत्रणा अधिक कडक करावी, असेही त्यांनी सुचवले.

वाचा: सिंधुदुर्गच्या अस्मितेसाठी 'एफडी' तोडा, पण शिवरायांचा पुतळा उभारा; निलेश राणेंचा प्रशासनाला कडक इशारा

​ड्रग्जचे जाळे आणि स्थानिक तरुणांचा वापर

सर्वात गंभीर मुद्दा मांडताना राणे म्हणाले की, ड्रग्ज आता केवळ शहरापुरते मर्यादित राहिले नसून ते ग्रामीण भागात घराघरात पोहोचत आहे. स्थानिक तरुणांना या व्यवसायात 'डिस्ट्रिब्युशन'साठी वापरले जात आहे, जे जिल्ह्याच्या भविष्यासाठी घातक आहे. पोलिसांनी केवळ ८ कोटींची दारू पकडून थांबू नये, तर या मुळापर्यंत पोहोचून गुन्हेगारांना मोठा 'झटका' द्यावा.

​प्रशासनाचा प्रतिसाद

यावेळी पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या कारवाईची माहिती दिली. दोन गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून, नाका टेस्ट आणि गांजा विरोधी मोहिमेअंतर्गत कठोर पावले उचलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्र्यांनीही या प्रकरणी सीसीटीव्हीचे जाळे विस्तारण्याचे आणि सीमा तपासणी नाक्यांवर कडक बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title : सिंधुदुर्ग ज़िला योजना बैठक में अपराध का मुद्दा गरमाया; बीफ तस्करों पर 'मोक्का' लगाने की मांग।

Web Summary : सिंधुदुर्ग ज़िला योजना बैठक में बढ़ते अपराध पर चर्चा हुई। नीलेश राणे ने बीफ तस्करों पर मोक्का लगाने और अवैध शराब व ड्रग्स के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की, स्थानीय युवाओं की संलिप्तता का आरोप लगाया। पुलिस ने कार्रवाई जारी रखने और सीसीटीवी निगरानी बढ़ाने का वादा किया।

Web Title : Crime issue heats up Sindhudurg meeting; MCOCA demand for beef smugglers.

Web Summary : Sindhudurg district planning meeting addressed rising crime. Nilesh Rane demanded MCOCA for beef smugglers and stricter measures against illegal liquor and drugs, alleging local youth involvement. Police reported ongoing actions, promising increased CCTV surveillance and border checks.