Sindhudurg: पत्नी गर्भवती असल्याचा बहाणा करत दुचाकी चोरी, पती-पत्नीला ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले
By अनंत खं.जाधव | Updated: August 22, 2023 15:47 IST2023-08-22T15:44:34+5:302023-08-22T15:47:59+5:30
सावंतवाडी : पत्नी गर्भवती असल्याचा बहाणा करून चक्क सावंतवाडी तालुक्यातील आरोस -गावठण येथे पहाटेच्या सुमारास दोन दुचाकी पळवून नेताना ...

Sindhudurg: पत्नी गर्भवती असल्याचा बहाणा करत दुचाकी चोरी, पती-पत्नीला ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले
सावंतवाडी : पत्नी गर्भवती असल्याचा बहाणा करून चक्क सावंतवाडी तालुक्यातील आरोस -गावठण येथे पहाटेच्या सुमारास दोन दुचाकी पळवून नेताना पती-पत्नीला ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले. हे दोघेही सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथील असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. हुसेन राजासाब मुजावर (वय २९) व वेदीका राजेंद्र देसाई (२७, दोघे रा. सालईवाडा, सावंतवाडी) या दोघा संशयितांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले.
सावंतवाडी शहरातील मुजावर याने पत्नी गर्भवती असल्याचा बहाणा करून आरोस येथे मध्यरात्रीच्या सुमारास घरा बाहेर ठेवलेल्या दोन दुचाकी चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र ही बाब ग्रामस्थांना कळताच या दोघांना गावातील योगेश सगुण देऊलकर व संदेश देऊलकर यांनी रंगेहाथ पकडले.
हे दोघे युवक पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास गोवा येथे कामानिमित्त जाण्यासाठी निघाले होते. पहाटेच्या सुमारास देऊलकर कामाला जाण्यासाठी निघाले असता त्यांची गाडी अज्ञात व्यक्ती सुरू करुन नेत असल्याचे पाहिले. तात्काळ त्याने आपला भाऊ संदेश यांच्या सोबतीने चारचाकी गाडीने चोरांचा पाठलाग करत दोघांना रंगेहाथ पकडले.
घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी येऊन दोघा चोरट्यांना ताब्यात घेतले. विशेष महिला गर्भवती असल्याचा बहाणा संशयिताकडून सुरू होता. सावंतवाडी पोलीस ठाण्यात दुचाकी मालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.