शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

महायुती सरकार बेरोजगारांच्या मुळावर उठले, कंत्राटी भरतीवरुन परशुराम उपरकरांचे टीकास्त्र

By सुधीर राणे | Updated: September 16, 2023 18:18 IST

सरकार बेरोजगार तरुणांना देशोधडीला लावण्याचे काम करत आहे

कणकवली: सद्याचे महायुती सरकार हे बेरोजगारांच्या मुळावर उठले आहे. राज्यात आणि जिल्ह्यात बेरोजगारी वाढत असताना भरतीबाबत नोटीस काढत दोन ते चार वेळा भरतीप्रक्रिया पुढे ढकलली आहे. कंत्राटी पदे भरण्यासाठी ९ कंपन्यांची नेमणूक करून तरुणांची फसवणूक केली आहे. ही भरतीप्रक्रिया एजंटाच्या माध्यमातून राबविली जाणार आहे. सरकार बेरोजगार तरुणांना देशोधडीला लावण्याचे काम करत असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे. कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, कंत्राटी पद्धतीने विविध विभागांमध्ये आता राज्य सरकार भरती करणार आहे. त्या कंपन्यांना १५ टक्के देण्याचे धोरण निश्चित केले आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी नोकऱ्या देण्यासाठी कंपनी नेमली. एजंट बेरोजगारांना गाठून लाखो रुपये घेऊन भरती होईल असे सांगत आहेत. मात्र, या भरती झालेल्या तरुणांच्या नोकऱ्या कायमस्वरूपी राहणार का? याची शाश्वती कोणीच देत नाही. त्यामुळे काही वर्षानंतर त्या तरुणांची नोकरी जाण्याची दाट शक्यता आहे. अशी भीतीही परशुराम उपरकर यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच तरुणांनी सावध व्हावे असे आवाहनही केले. भरती झालेल्या तरुणांना ५ वर्षानंतर नोकरीची हमी राहणार नाही. या तरुणांच्या जीवाशी खेळण्याचं काम राज्य सरकारने चालवले आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेला मनसेचा विरोध असल्याचेही उपरकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMNSमनसेParshuram Upkarपरशुराम उपरकर Governmentसरकार