सिंधुदुर्ग-रत्नागिरीचा उमेदवार कमळ चिन्हावरच लढणार, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले स्पष्ट संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 12:02 PM2024-03-04T12:02:18+5:302024-03-04T12:03:19+5:30

'एखादा मुख्यमंत्री तुमच्या समोर येतो, तेव्हा काहीतरी विशेष असणार हे तुम्ही ओळखले पाहिजे आणि कामाला लागले पाहिजे'

The candidate of Sindhudurg Ratnagiri will fight on the lotus symbol, Goa Chief Minister Dr. Pramod Sawant gave a clear indication | सिंधुदुर्ग-रत्नागिरीचा उमेदवार कमळ चिन्हावरच लढणार, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले स्पष्ट संकेत 

सिंधुदुर्ग-रत्नागिरीचा उमेदवार कमळ चिन्हावरच लढणार, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले स्पष्ट संकेत 

सावंतवाडी : कोण काय बोलतो, याचा विचार करू नका. एखादा मुख्यमंत्री तुमच्या समोर येतो, तेव्हा काहीतरी विशेष असणार हे तुम्ही ओळखले पाहिजे आणि कामाला लागले पाहिजे. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कमळ चिन्हावरच लढविणार, असे स्पष्ट संकेत गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी दिले.

भाजपचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुथस्तरीय कार्यकर्ता महासंमेलन रविवारी सावंतवाडी येथे झाले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत बोलत होते.

यावेळी माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली, बाळ माने, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप नेते बाळासाहेब पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमसावंत भोसले, शैलेश दळवी, काका ओगले, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, प्रज्ञा ढवण, रणजित देसाई, महेश सारंग, संजू परब, सध्या तेरसे, बंड्या सावंत, अजय गोंदावळे, दादू कविटकर, आनंद मेस्त्री, राजेंद्र म्हापसेकर, सोशल मीडियाचे राजू परब आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री सावंत म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षांत सर्व घटकांसाठी काम केले. २०१४ पूर्वी काँग्रेसच्या काळात निर्माण झालेली योजना आता कोणाला आठवत नाही; पण मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर अनेक योजना निर्माण केल्या. त्या आज सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचत आहेत, हे विशेष आहे. २०१४ च्या पूर्वी अनेक घोटाळे झाले, त्याचीच चर्चा होत होती; पण आता या दहा वर्षांत विकासावर चर्चा होऊ लागली आहे, हे विशेष आहे. देशात मोदी गॅरंटी आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस समाधानी असून, त्याच्या आयुष्यात अधिकचा बदल व्हायचा झाला, तर २०२४ मध्ये आपणास येथील उमेदवार कमळ चिन्हावरच निवडून द्यावा लागेल.’

यावेळी नीलेश राणे म्हणाले, ‘सिंधुदुर्ग रत्नागिरी हा सर्वांत मोठा मतदारसंघ आहे आणि महत्त्वाचे म्हणजे सर्वांत चांगले वातावरण २०२४ असल्याने भाजपच्या चिन्हावर लढविण्यात यावा. या मतदारसंघातून लढविण्याचा अधिकार भाजपचा आहे.’

तेली म्हणाले, ‘सिंधुदुर्ग- रत्नागिरी मतदारसंघात भाजपची ताकद असून, सर्वांनी एकी कायम टिकवून मतदारसंघावर भाजपचा उमेदवार निवडून आणा. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते काका ओगले, माजी नगराध्यक्ष संजू परब, लखमसावंत भोसले, माजी जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, शैलेंद्र दळवी, चंद्रकांत जाधव, दादू कविटकर आदींनी विचार मांडले. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: The candidate of Sindhudurg Ratnagiri will fight on the lotus symbol, Goa Chief Minister Dr. Pramod Sawant gave a clear indication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.