सिंधुदुर्गच्या पालकमंत्रीपदी ठाकरे की परब ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 02:38 IST2019-12-31T02:38:40+5:302019-12-31T02:38:57+5:30
कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष

सिंधुदुर्गच्या पालकमंत्रीपदी ठाकरे की परब ?
सिंधुदुर्ग : ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेटपदी शपथ घेतलेल्या शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे किंवा अॅड. अनिल परब या दोघांपैकी कोणा एकाच्या खांद्यावर सिंधुदुर्गच्या पालकमंत्री पदाची धुरा जाण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे. त्याचवेळी शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीनपैकी दोन आमदार मागील पाच वर्षांपासून आहेत. असे असतानाही यावेळी दोन्ही विद्यमान आमदारांना मंत्रिमंडळातून डावलल्याबाबत सेना नेतृत्वाबाबत नाराजीची भावना व्यक्त होत आहे.