ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईकांना पुन्हा एसीबीची नोटीस; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 10:57 IST2025-02-04T10:48:12+5:302025-02-04T10:57:58+5:30

येत्या ११ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता रत्नागिरी येथील कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे. 

Thackeray group MLA Vaibhav Naik gets another ACB notice; What is the real issue? | ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईकांना पुन्हा एसीबीची नोटीस; नेमकं प्रकरण काय?

ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईकांना पुन्हा एसीबीची नोटीस; नेमकं प्रकरण काय?

कणकवली: रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांना जबाब नोंदणीसाठी पुन्हा नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये येत्या ११ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता रत्नागिरी येथील कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे. 

वैभव नाईक यांच्यासह त्यांच्या पत्नी स्नेहा वैभव नाईक यांना रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागकडून नोटीस बजावण्यात आली आहे. याआधी ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांच्यामागे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ससेमिरा लागला आहे. आता वैभव नाईक यांना पुन्हा एकदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस पाठवली आहे. दरम्यान, वैभव नाईक चौकशीसाठी उपस्थित राहतात का ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

या नोटिसीत म्हटले आहे की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आपल्या मालमत्तेच्या अनुषंगाने चौकशी सुरु करण्यात आली आहे. उघड चौकशीच्या अनुषंगाने ५ डिसेंबर२०२२ रोजी ला.प्र.वि. कार्यालय रत्नागिरी येथे आपली पत्नी सौ. स्नेहा वैभव नाईक यांचेसह उपस्थित राहिला. परंतू लोकप्रतिनिधी कालावधीतील आपली मालमत्ता, उत्त्पन्न व खर्च याबाबत परिपूर्ण माहिती त्यावेळी उपलब्ध नसल्याने सदर माहिती आपण मागाहून सादर करणार असलेबाबत समक्ष सांगितल्याने तसा त्यावेळी प्राथमिक स्वरुपात आपला जबाब नोंदविण्यात आला.

त्यानंतर चौकशीच्या अनुषंगाने मत्ता व दायित्वाचे १ ते ६ फॉर्ममधील माहिती व आवश्यक कागदपत्रांसह अनुक्रमे दि.३ जानेवारी २०२३ रोजी आणि दि. २८ जून २०२३ रोजी उपस्थित रहाणेबाबत आपणास या कार्यालयाकडून कळविण्यात आले होते. मात्र आपण उपस्थित न राहता दिनांक २८ जून २०२३ रोजी आपले अकाउंटंट अमोल केरकर हे उपस्थित राहिले. परंतू त्यांनी आणलेली कागदपत्रे परिपुर्ण नसत्त्याने ती न देता, काही कालावधी नंतर आपले उपस्थितीत सदरची कादगपत्रे हजर करु असे पत्र त्यांनी या कार्यालयास दिलेले आहे. परंतू त्यानंतर अद्यापपावेतो आपलेकडून कागदपत्रांबाबत पुर्तता झालेली नाही अगर आपण उपस्थित राहिले नाहीत.

तरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालयाकडून आपले मालमत्तेच्या सुरु असलेल्या उघड चौकशीचे अनुषंगाने श्री नाईक, त्यांची पत्नी सौ. स्नेहा यांचे तसेच HUF व नाईक स्टोन इंडस्ट्रीज यांचे दिनांक १ जानेवारी २००२ ते २९ सप्टेंबर२०२२ या कालावधीतील उत्पन्न, खर्च व मालमत्ता याबाबतची आवश्यक ती परिपुर्ण माहिती आपणास या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या मत्ता व दायित्वाचे १ ते ६ फॉर्ममध्ये भरुन तसेच सदर कालावधीतील आयकर विवरणपत्रे, ऑडीट रिपोर्ट, कॉम्प्युटेशन ऑफ इनकम, शेडयुल बॅलन्सशीट, प्रॉफीट अॅन्ड लॉस अकाऊंट डिटेल्स शेडयुल व त्यासंबधीत कागदपत्रांसह दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालय येथे उपस्थित रहावे. तसेच प्रकारचे पत्र स्नेहा नाईक यांना पाठविण्यात आले असून या उघड चौकशी जबाब नोंदविण्यासाठी ११ फेब्रुवारी रोजी उपस्थित रहावे, असे नोटिसीत म्हटले आहे.

Web Title: Thackeray group MLA Vaibhav Naik gets another ACB notice; What is the real issue?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.