शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

शिक्षक समितीचे येत्या सोमवारी कोकणभवन समोर धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 12:50 IST

कणकवली : कोकण विभागातील जिल्ह्यांपैकी सिंधुदुर्ग , रत्नागिरी जिल्ह्यातील सद्यस्थितीत शिक्षकांच्या १४ ते १५ टक्के रिक्त असलेल्या जागा शिक्षक ...

कणकवली : कोकण विभागातील जिल्ह्यांपैकी सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील सद्यस्थितीत शिक्षकांच्या १४ ते १५ टक्के रिक्त असलेल्या जागा शिक्षक भरतीने तत्काळ भरण्यात याव्यात. यासह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवनसमोर येत्या सोमवारी (दि. २८) सकाळी १० वाजल्यापासून राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.अशी माहिती संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली. या आंदोलनात कोकणविभागासह राज्यातील हजारो आंतरजिल्हा बदली शिक्षक सहभागी होणार आहेत.यावेळी शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, राज्य सहसचिव नामदेव जांभवडेकर, कोकण विभाग उपाध्यक्ष शरद नारकर, कार्याध्यक्ष नारायण नाईक, प्रवक्ता सुनिल चव्हाण, कणकवलीतिल शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस, कणकवली तालुकाध्यक्ष विनायक जाधव, श्रीकृष्ण कांबळी आदी उपस्थित होते.      नितीन कदम म्हणाले, या आंदोलनात सिंधुदुर्गातील अनेक आंतरजिल्हा बदली बांधव व शिक्षक समितीचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये आंतरजिल्हा बदली संबधाने गेल्या ६ वर्षापासून विविध गंभीर प्रश्न निर्माण झालेले असून या प्रश्नांबाबत संघटनेने सातत्याने जिल्हास्तर ते राज्यस्तरापर्यंत पाठपुरावा केलेला आहे.परंतु सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये आंतरजिल्हा बदली टप्पा क्रमांक १,३,४ मधील सुमारे ४५० शिक्षक सन २०१६ पासून कार्यमुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये रिक्त पदांचे प्रमाण १० टक्के पेक्षा जास्त आहे. त्यामुळे शासनाच्या आंतरजिल्हाबदली टप्पा क्रमांक ५ मध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या जिल्ह्यांमधील कार्यरत आंतर जिल्हा बदली शिक्षकांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTeacherशिक्षक