शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Tauktae Cyclone: सिंधुदुर्गातील राजकारण ढवळून निघणार, आजी-माजी मुख्यमंत्री एकाच दिवशी जिल्ह्यात येणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 7:11 PM

Tauktae Cyclone in Sindhudurg: मुख्यमंत्री उद्ध ठाकरे हे शुक्रवारी २१ मेला जिल्ह्यात दाखल होत आहेत. तर त्याच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही येत असल्याने आजी-माजी मुख्यमंत्र्यामुळे तौक्ते चक्रीवादळानंतर राजकारण ही ढवळून निघणार आहे.

- अनंत जाधव सावंतवाडी - तौक्ते वादळानंतर कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आजी माजी मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असून, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे शुक्रवारी २१ मे ला जिल्ह्यात दाखल होत आहेत. तर त्याच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही येत असल्याने आजी माजी मुख्यमंत्र्यामुळे तौक्ते चक्रीवादळानंतर राजकारण ही ढवळून निघणार आहे. (Politics in Sindhudurg will be stirred, CM Uddhav Thackeray and former CM Devendra Fadanvis will come to the district on the same day)तौक्ते चक्रीवादळ रविवारी सिंधुदुर्गसह कोकण किनारपट्टीवर येउन धडकले आणि किनारपट्टी भागातच नव्हे तर आजू बाजूच्या तालुक्यातही मोठे नुकसान झाले आहे. हे नुुकसान साधरणत: पन्नास कोटींचे असून, तौक्ते वादळाने किनारपट्टी भागातील छोटे छोटे हॉटेल तसेच लहान होडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळाने अनेकांच्या स्वप्नाचा चक्काचूर झाला आहे. विद्युत विभागाचे ही मोठे नुकसान झाले असून,अनेक गावात गेले चार दिवस विद्युत पुरवठा सुरळित झाला नाही.विद्युत विभागाने तर राज्यातील वेगवेगळ्या भागातून विद्युत कर्मचारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाठवले असून,हे कर्मचारी जिल्ह्यात दाखल झाले असून,विद्युत विभागाचेच साधरणता १५ कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या वादळातील सगळ्यात मोठे वादळ असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी असे वादळ कधीही आले नव्हते. तौक्ते हे वादळांने रविवार हा दिवस भयानक असाच होता वादळामुळे पुढच्या क्षणी काय होणार हे कोणाला सांगता येत नव्हते. सर्वत्र अंधार पडला होता.अशात अनेकांनी जीव मुठीत घेउन रात्र काढली.मात्र आता वादळानंतर नुकसान ग्रस्तांच्या दुुखा:वर फुकर घालण्यासाठी अनेक नेत्याची रिघ कोकणात लागणार आहे. महत्वाचे म्हणजे आजी माजी मुख्यमंत्री शुक्रवारीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत असल्याने अनेकांचे लक्ष या  दौऱ्याकडे लागून राहिले असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.यात जी पडझड झाली आहे त्यात मिळणारी नुकसान भरपाई ही पूर्वीच्या निकषाप्रमाणे आहे. हे निकष केंद्र सरकारने ठरवून दिले आहेत. मात्र या निकषात आता बदल होणे गरजेचे असून, जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल २० घरे अशी आहेत कि ती पूर्ण पणे जमिनदोस्त झाली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात सत्ता आहे. या सत्तेमुळे केंद्राकडून जर नुकसान ग्रस्त भागाची पाहाणी करण्यासाठी पथक आल्यास आणखीही मदत मिळू शकते. त्यामुळे या आजी माजी मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. 

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस