शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

टँकरच्या स्फोटात वाठार येथील चालकाचा मृत्यू, फोंडाघाटातील वळणावर अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 12:06 IST

कणकवली : सांगली-मिरज येथून सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील फोंडाघाट, हवेलीनगर येथील पोकळे पेट्रोलियम येथे पेट्रोल, डिझेल घेऊन येणाऱ्या टँकर (क्रमांक ...

कणकवली : सांगली-मिरज येथून सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील फोंडाघाट, हवेलीनगर येथील पोकळे पेट्रोलियम येथे पेट्रोल, डिझेल घेऊन येणाऱ्या टँकर (क्रमांक एमएच- ०७-एक्स- १४७९) चा फोंडाघाटात दाजीपूर खिंडीच्याखाली एका वळणावर बुधवारी अपघात झाला होता. या अपघातानंतर टँकरने पेट घेतल्याने स्फोट झाला होता. या अपघातात टँकरचालक संदीप सुभाष इनामदार (वय ४४, रा. वाठार तर्फ वडगाव, ता. हातकणंगले, कोल्हापूर) यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली.फोंडाघाट, हवेलीनगर येथे किरण प्रकाश पोकळे (वय ४५, रा. कासार्डे, जांभुळगाव) यांचा पोकळे पेट्रोलियम हा इंधनाचा पंप आहे. त्यांची पत्नी संतोषी हिच्या नावे अशोक लेलँड कंपनीचा टँकर (एम.एच.- ०७-एक्स- १४७९) आहे. त्यामधून पेट्रोल, डिझेल वाहतूक केली जात असे. त्या टँकरवर संदीप सुभाष इनामदार हे चालक म्हणून गेली चौदा वर्षे कामाला होते. २ नोव्हेंबर रोजी ते आपल्या घरी वाठार तर्फ वडगाव येथे गेले होते. त्यादिवशी तिथे मुक्काम केल्यावर ४ नोव्हेंबर रोजी मिरज डेपोतून त्यांनी टँकरमध्ये पेट्रोल व डिझेल भरले. तसेच फोंडाघाट येथे ते निघाले. किरण पोकळे यांनी त्यांना सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास फोन केला असता आपण राधानगरी येथे पोहोचलो असून, टँकरचे ब्रेक कमी लागत आहेत, पण आपण सावकाश येतो असे त्यानी सांगितले. काहीवेळाने पोकळे यांना एका पेट्रोल पंप मालकाचा फोन आला. त्यांनी तुमचा टँकर फोंडाघाटात एका वळणावर अपघातग्रस्त झाल्याचे सांगितले. त्यानंतर पोकळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता टँकरला आग लागली होती, तर संदीप इनामदार हे रस्त्याच्या बाजूला आगीत होरपळलेल्या स्थितीत पडले होते. त्यांची काहीच हालचाल होत नव्हती. काही लोकांनी पोलिस व रुग्णवाहिकेला बोलाविले. संदीप यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, ते मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

गुन्हा दाखलघटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक बंबांनी आग आटोक्यात आणली. त्यानंतर फोंडाघाट रस्त्यावरील वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली. या घटनेप्रकरणी पोलिसांनी टँकरचालक संदीप इनामदार यांच्यावर हयगयीने वाहन चालवून टँकरच्या नुकसानीस तसेच स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

घराबाहेर नागरिकांनी गर्दीदरम्यान, इनामदार कुटुंबीय मूळचे सातारा येथील असून गेली २० वर्षे ते वाठार (ता. हातकणंगले) येथील श्रीराम कॉलनीत राहतात. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी आहे. मुलगा अमेय (वय १९) महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे, तर मुलगी युगंधरा (१५) दहावीत शिकत आहे. इनामदार मृत झाल्याची बातमी टँकरमालकांनी त्यांच्या नातेवाइकांना दिली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत पत्नी व मुलांना ही घटना स्पष्टपणे सांगितली नव्हती. यामुळे ते भांबावलेल्या अवस्थेत होते. श्रीराम कॉलनी येथे त्यांच्या घराबाहेर नागरिकांनी गर्दी केली होती.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू