चिपी विमानतळासंदर्भात पुन्हा आढावा बैठक घ्या, मुख्यमंत्री ठाकरे यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 21:22 IST2021-02-02T21:20:27+5:302021-02-02T21:22:30+5:30

Chipi airport Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळासंदर्भातल्या सर्व त्रुटी १० फेब्रुवारी पर्यंत दूर करण्याचे आदेश आयआरबीच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच या विमानतळासंदर्भात त्रुटी दूर करून पुन्हा आढावा बैठक घेण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

Take a review meeting regarding Chippewa Airport, orders of Chief Minister Thackeray | चिपी विमानतळासंदर्भात पुन्हा आढावा बैठक घ्या, मुख्यमंत्री ठाकरे यांचे आदेश

चिपी विमानतळासंदर्भात पुन्हा आढावा बैठक घ्या, मुख्यमंत्री ठाकरे यांचे आदेश

ठळक मुद्दे१० फेब्रुवारी रोजी आढावा बैठक घ्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश वैभव नाईक यांची माहिती

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळासंदर्भातल्या सर्व त्रुटी १० फेब्रुवारी पर्यंत दूर करण्याचे आदेश आयआरबीच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच या विमानतळासंदर्भात त्रुटी दूर करून पुन्हा आढावा बैठक घेण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

चिपी विमानतळा संदर्भात आढावा बैठक मंगळवारी मुंबई येथे सह्याद्री अथितीगृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्याचे मुख्य सचिव, उद्योग विभागाचे सचिव, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव, आयआरबीचे प्रमुख अधिकारी व विविध खात्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत दिल्ली येथील डिजीसीए समितीने चिपी विमानतळाची पाहणी केल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने ज्या त्रुटी काढल्या आहेत, त्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यातल्या बहुतांशी त्रुटी दूर केल्या असल्याचे आयआरबीच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. उर्वरीत त्रुटी देखील पूर्ण करण्याची ग्वाही आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व त्रुटी १० फेब्रुवारीपर्यंत दूर करण्याचे आदेश आयआरबीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे पुन्हा आढावा बैठक त्याच दिवशी घेण्याचे आदेशही दिले आहेत. असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.

Web Title: Take a review meeting regarding Chippewa Airport, orders of Chief Minister Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.