शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणप्रकरणी उपोषण स्थगित

By admin | Updated: January 10, 2017 22:55 IST

सागर वाघ यांनी साधला वायरी ग्रामस्थांशी संवाद : पोलिस उपनिरीक्षक निलंबनाची मागणी ग्रामस्थांच्या अंगलट

मालवण : पर्यटन व्यावसायिक सतीश आचरेकर याने महाविद्यालयीन युवक मोहित मिलिंद झाड याच्यावर केलेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी वायरी ग्रामस्थांनी छेडलेले उपोषण जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशामुळे स्थगित केले. यावेळी उपोषणात असलेले पोलिस उपनिरीक्षक डॉ. सागर वाघ यांचे निलंबन करण्याची मागणी ग्रामस्थांच्या अंगलट आली. डॉ. वाघ यांनी थेट ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्याप्रती असलेला गैरसमज दूर केला. त्यामुळे गेले दहा दिवस वाघ यांचे निलंबन करण्याची मागणी करणारे काही ग्रामस्थ तोंडघशी पडले. उपोषण स्थगित करण्यात यावे, अशा आशयाच्या नोटिसा सोमवारी रात्री उशिरा प्राप्त झाल्याने वायरी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. आम्हाला नोटिसा बजावण्यापेक्षा हल्लेखोर आचरेकर याला यापूर्वीच बजावण्यात यायला हव्या होतात, असे सांगत वर्षभर विविध कारणामुळे मनाई आदेश लागू करण्यात येत असेल तरी जनतेने न्याय केव्हा मागावा, असाही संतप्त सवाल केला. वायरी ग्रामस्थांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता मालवण तहसीलदार यांना सतीश आचरेकर याच्या शिक्षेचा निकाल लागेपर्यंत त्याचा पर्यटन व्यवसाय बंद ठेवण्यात यावा अशा आशयाचे तर पोलिस निरीक्षकांना आचरेकर याच्यावर तातडीने हद्दपारीची कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी निवेदनातून केली. यावेळी पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत वायरी सरपंच सुजाता मातोंडकर, उपसरपंच ललीतकुमार वराडकर, भगवान लुडबे, डॉ. जितेंद्र केरकर, श्याम झाड, मिलिंद झाड, प्रसाद चव्हाण, प्रदीप मांजरेकर, प्रसाद आडवणकर, गोट्या मसुरकर, छोटू सावजी, साक्षी लुडबे, वर्षा वेंगुर्लेकर, बाबल गोसावी, केदार झाड, देवबाग सरपंच उल्हास तांडेल, भाजप तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, बबलू राऊत, जगदीश सातार्डेकर, अविनाश सामंत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)ग्रामस्थ पडले तोंडघशीमोहित झाड मारहाण प्रकरणानंतर वायरी ग्रामस्थांनी पोलिस उपनिरीक्षक डॉ. सागर वाघ यांना जबाबदार धरून त्यांच्यावर निलंबनासाठी दोन गाव बैठका व रास्तारोको आंदोलन छेडले होते. मंगळवारी वाघ यांच्या निलंबनाची मागणी करत छेडण्यात आलेले उपोषण स्थगित झाले. त्यानंतर पोलिस निरीक्षकांसमवेत झालेल्या बैठकीत डॉ. वाघ यांनी घटनाक्रमाचे स्पष्टीकरण देताना आपण फिर्याद देण्यास आलेल्या व्यक्तीच्या कॉलरला पकडले नसून पोलिस ठाण्यात येणाऱ्यांच्या गळ्यात हात टाकून तपास करणे ही आपली शैली असल्याचे सांगितले. राजन चव्हाण यांची आपण फिर्याद घेणार नाही, असे म्हटले नाही असे सांगितल्यावर चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांनी चुकीचे केलेले आरोप मान्य करत वाघ यांच्या स्पष्टीकरणानंतर ग्रामस्थ तोंडघशी पडले. हद्दपारीची कारवाई करणार : बोडकेमालवणात मासेमारीनंतर पर्यटन व्यवसाय वाढत आहे. मात्र पर्यटकांना वेळोवेळी मारहाण करणाऱ्या सतीश आचरेकरची दहशत वाढत आहे. त्यामुळे सतीश आचरेकरसारख्या विघातक प्रवृत्ती मालवणातून उधळून लावण्यासाठी त्याला हद्दपार करण्याची आक्रमक मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. यावेळी पोलिस निरीक्षक बोडके यांनी आचरेकर याच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून त्याच्यावर असलेल्या गुन्ह्याच्या आधारे हद्दपारीची कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले