संशयित चोरट्याच्या मुसक्या आवळल्या, वैभववाडी पोलीसांची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 18:46 IST2020-10-24T18:43:56+5:302020-10-24T18:46:33+5:30
vaibhavawadi, crimenews, police, sindhdurug वैभववाडी शहरातील माईणकरवाडी येथील घरातून दीड वर्षापूर्वी भरदिवसा दोन मोबाईल घेऊन पसार झालेल्या संकेत शिवराम पवार(३१, रा. उंबर्डे कातकरवाडी) या संशयिताच्या कणकवलीत मुसक्या आढळल्या. वैभववाडी पोलीसांनी गुरुवारी रात्री ही कारवाई केली. या गुन्ह्यातील मोबाईल पोलिसांनी या पुर्वीच ताब्यात घेतलेले आहेत. मात्र गेले वर्षभर तो गुंगारा देत होता.

संशयित चोरट्याच्या मुसक्या आवळल्या, वैभववाडी पोलीसांची कामगिरी
वैभववाडी : शहरातील माईणकरवाडी येथील घरातून दीड वर्षापूर्वी भरदिवसा दोन मोबाईल घेऊन पसार झालेल्या संकेत शिवराम पवार(३१, रा. उंबर्डे कातकरवाडी) या संशयिताच्या कणकवलीत मुसक्या आढळल्या. वैभववाडी पोलीसांनी गुरुवारी रात्री ही कारवाई केली. या गुन्ह्यातील मोबाईल पोलिसांनी या पुर्वीच ताब्यात घेतलेले आहेत. मात्र गेले वर्षभर तो गुंगारा देत होता.
माईणकरवाडीतील अवधूत माईणकर यांच्या घरात कृषी महाविद्यालयातील चंचल भुते आणि रुचिरा नार्वेकर या विद्यार्थ्यीनी राहत होत्या. ३ ऑक्टोबर २०१९ रोजी दुपारी तीनच्या वाजता त्या विद्यार्थ्यीनी घरात आराम करीत होत्या. त्यावेळी अचानक एक अज्ञात व्यक्ती घरात घुसली.
त्याने काही कळायच्या आतच या दोघींचे १५ हजार रुपये किमंतीचे दोन मोबाईल घेऊन पलायन केले होते. विद्यार्थ्यीनींनी आरडाओरडा केल्याने तो संशयित शुकनदी पार करुन दुचाकीने पसार झाला होता. यासंदर्भात त्या विद्यार्थ्यीनींनी वैभववाडी पोलिसांत तक्रार दिली होती.
या प्रकरणाचा तपास केल्यानंतर हे दोन्ही मोबाईल वापरात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्याने एक मोबाईल मीरा भाईंदर तर दुसरा मोबाईल नालासोपरा येथील एका व्यक्तीला विक्री केले होते.
पोलिसांनी ते दोन्ही मोबाईल ताब्यात घेतले. त्याचवेळी हे दोन्ही मोबाईल संकेत पवार याने चोरल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु गेले वर्षभर हा संशयित पोलीसांना गुंगारा देत होता. दरम्यान गुरुवारी संशयित पवार हा कणकवलीला आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यामुळे पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस हवालदार राजू जामसंडेकर, मारुती सोनटक्के, संदीप राठोड यांनी कणकवली येथे पाळत ठेवून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याची चौकशी सुरु असून शनिवारी त्याला कणकवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलीस हवालदार राजू जामसंडेकर या प्रकरणचा तपास करीत आहेत.